Santosh Deshmukh case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या ‘त्या’ चौकशी अहवालावर सरकारने घेतला मोठा निर्णय; कारवाईवर होणार फैसला

Maharashtra government decision : सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Devendra Fadnavis, Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh case update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. अहवालातील निष्कर्ष, शिफारशींचा विचार करून त्यानुसार कारवाईवर अंतिम फैसला घेतला जाणार आहे. त्यासाठी छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. तसेच राज्य सरकारलाही या प्रकरणाचे चांगलेच हादरे बसले. हत्याप्रकरणी वाल्मिक कराडसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या तुरूंगात आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी वर्षभरापूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

विधिमंडळाच्या २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १५ जानेवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Modi Trump phone call : मोदी अन् ट्रम्प यांच्यात आठवेळा फोनवरून गुफ्तगू; गाजत असलेल्या वादावर भारताकडूनच मोठा खुलासा

समितीने मागीलवर्षी ऑक्टोबर हमिन्यात आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालामध्ये घटनेस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सविस्तर तपशील दिला आहे. भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी अल्प व दीर्घकालीन शिफारसी केल्या आहेत.

Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Ambernath Election : अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का; शिंदेंनी मनसुबे उधळले, रविंद्र चव्हाणांच्या खेळीला शह देत सत्ता काबीज

चौकशी समितीच्या निष्कर्षांची छाननी करून आणि सुचविलेल्या उपायोजनांवर शासनाने करावयाच्या कार्यवाहीचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने छाननी समिती स्थापन केली आहे. त्याबाबत शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष असतील.

प्रधान सचिव (विशेष), अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट, उपसचिव (विधी) हे सदस्य असतील. गृह विभागाच्या कार्यासन शाखेचे उप सचिव समितीचे सदस्य सचिव असतील. दरम्यान, समितीचा कालावधी शासन निर्णयात नमूद करण्यात आलेला नाही.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com