HSC Paper Leak: मुख्याध्यापक, शिक्षकानेच फोडला 12वीचा पेपर; मोठं रॅकेट उघड

Nagpur HSC paper leak News update: आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.या पेपरफुटीत मोठं रॅकेट उघड होण्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Nagpur HSC paper leak News update
Nagpur HSC paper leak News updateSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Paper Leaked: नागपूरमधील बारावीच्या पेपर फुटीसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा, प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

तपासात मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनीच पेपर फोडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.या पेपरफुटीत मोठं रॅकेट उघड होण्याचा शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बारावी पेपरफुटी तपासात नवा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. बारावीचे दोन नव्हे तर तीन पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. राज्य परीक्षा बोर्डाकडून तपास सुरू झाला आहे, याला राज्य परीक्षा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

२५ प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठवल्या होत्या पण २४ प्रश्नपत्रिकाच परीक्षा केंद्रावर पोहचल्या, अशी तक्रार केंद्र पर्यवेक्षकाने बोर्डाकडे केली आहे. विज्ञान शाखेचेच्या फिजिक्स, केमेस्ट्री, गणिताच्या पेपर संदर्भात ही बाब घडली आहे.

Nagpur HSC paper leak News update
Non Teaching Staff: शिक्षकेतर कर्मचारी होणार शिक्षक, मुख्याध्यापक; थेट नियुक्ती, कुणाला मिळणार लाभ?

नागपूरमध्ये 18 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. फिजिक्स (Physics) आणि केमिस्ट्री (Chemistry) या दोन विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. ती विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.

Nagpur HSC paper leak News update
Krishnaraj Mahadik News: युवकांमध्ये क्रेझ! ७ लाख सबस्क्रायबर्स! युट्युबरच्या खांद्यावर भाजपच्या युवा मोर्चाची जबाबदारी

परीक्षेच्या दिवशी केंद्रावर प्रेसमधून सीलबंद पाकिटे पाठवली जातात, मग हा प्रकार कसा घडला? याबाबत आता सखोल चौकशी सुरु आहे. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचाही पेपर डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com