Maharashtra News Live Update: पुण्यात आज MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, राजकीय नेतेही सहभागी होणार

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Pimpri : डीजे अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू, दोन जणांवर गुन्हा दाखल

पिंपरीत दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर पडून महिलेच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल तर स्पीकर आणि मंडप मालकाला अटक करण्यात आली आहे..मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उभारणारे मेहबूब उर्फ सॅम रमजान शेख, स्पीकर साऊंड सिस्टम उपलब्ध करून देणारे कुणाल अनिल भोगावडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात आज एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून मोर्चेा निघणार आहे. विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चामध्ये काही राजकीय नेते सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे, आज  केंद्रीय मंत्रिमंडळाची आढावा बैठक होणार आहे. यासह वाचा महत्वाचे अपडेट वाचा

छत्रपती संभाजीनगर आग प्रकरण;जुळ्या चिमुकल्यांना दुर्दैवी मृत्यू

आग लागल्याने जीव वाचविण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतर करुन उपचार घेणाऱ्या जुळ्या चिमुकल्यांच्या उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com