MlC Election : उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम! विधान परिषदेच्या एका जागेसाठी दबाव वाढला; महाविकास आघाडीत 'हायव्होल्टेज ड्रामा'

Maharashtra Council Election News: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटचे दोनच दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षात लगभग सुरु आहे.
Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटचे दोनच दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षात लगभग सुरु आहे. त्यातच विधान परिषदेच्या नऊ जागांपैकी विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ पाहता महायुतीमधील भाजपच्या वाट्याला पाच जागा येत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत असल्याने याठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जागा रिक्त होत असल्याने ही जागा त्यांनीच लढावी असा आग्रह काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणूक लढविण्याबाबत ठाम नाहीत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असून त्यामुळेच या एका जागेसाठी मित्रपक्षांचा दबाव वाढला असला तरी महाविकास आघाडीत 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहवयास मिळत आहे.

Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
vidhanparishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच! नीलम गोऱ्हेंसह 'ही' नावे चर्चेत; कोणाची लागणार लॉटरी, कोणाचा पत्ता कट होणार?

विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी मोठी रस्सीखेच दिसत आहे. अद्याप कोणत्याच पक्षाचा उमेदवार ठरला नसल्याने जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहे. मात्र, कोणत्याच विषयवार एकमत होत नाही. काही दिवसापूर्वीच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंची भेट घेत पुन्हा निवडणूक लढविण्याची त्यांनी विनंती केली. तर दुसरीकडे तुम्ही निवडणूक लढणार नसाल तर काँग्रेसला जागा सोडण्याची मागणी केली आहे.

Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी दहाव्या उमेदवाराची एन्ट्री झाल्यास 'घोडेबाजारा'ला ऊत! ठाकरेंना 'क्रॉस व्होटिंग'चा फटका ? निकालापूर्वीच मविआमध्ये धाकधूक!

त्यासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या नावाची चर्चा महाविकास आघाडीत जोरदार पाहावयास मिळत आहे.

Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
MLC election 2026 : राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा सस्पेन्स आज संपणार! सुनेत्रा पवारांच्या दरबारी खलबतं! एका जागेसाठी 'ही' चार नावे आघाडीवर

महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी काँग्रेसच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी फायनल मानली जात होती. तर दुसरीकडे ठाकरे उमेदवार असल्यास विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अन्यथा महायुतीकडून आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवण्याची त्याची केली जात असल्याचे समजते.

Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी दहाव्या उमेदवाराची एन्ट्री झाल्यास 'घोडेबाजारा'ला ऊत! ठाकरेंना 'क्रॉस व्होटिंग'चा फटका ? निकालापूर्वीच मविआमध्ये धाकधूक!

त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावरून उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यावरून विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वानाच उमेदवारांची प्रतीक्षा लागून राहीली आहे.

Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचा 'मास्टरस्ट्रोक'! एका जागेसाठी 'या' नावांची जोरदार चर्चा; राष्ट्रवादीतून कोणाला आमदारकीची लॉटरी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com