Maharashtra Politics Live Update : नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Marathi Breaking Live Headlines Updates : नाशिकला भूकंपाचे धक्के बसले असून 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यासह आजच्या दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर आधारवाडी कारागृहातून सुटका झाली आहे. हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी असल्याने रमेश म्हात्रे थेट गोव्याला रवाना झाले आहेत.

पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा -  सदानंद दाते

पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा, असं मत राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जबाबदारीचे असून हे पदक ते बाळगताना परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी हे पदक आदर्श ठरणारे आहे. आपल्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास केला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थात्मक रचना निर्माण करावी लागेल, असं दाते यांनी म्हटलं आहे. राज्यातील सन २०२३ व २०२४ मधील उत्कृष्ट अन्वेषणासाठी निवड झालेल्या एकूण २२ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना भारत सरकार, केंद्रीय गृहमंत्रालय पुरस्कृत ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्याचा पुरस्कार वितरण समारंभ पोलिस संशोधन केंद्रात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

११ ऑगस्ट पासून दूध दरात दोन रुपयांची वाढ

पुण्यात ११ ऑगस्ट पासून दूध दरात दोन रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार आहेत. गायी आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ होणार आहे. डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते आष्ट्यासह कागलमधील विविध विकासकामाचं उद्धाटन करणार आहेत.

नाशिकला भूकंपाचे धक्का, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. रात्री झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. प्रशासनाने नागरिकांनी संयम ठेवण्याच्या आणि रात्री सुरक्षित ठिकाणी झोपण्याचं आवाहन केलं होतं. तसंच अफवा पसरवू नये असंही आवाहन रात्री प्रशासनाने नाशिककरांना केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com