Maharashtra Live Updates : दहावी पेपर चोरी प्रकरणी गटशिक्षण अधिकारी निलंबित

Marathi Political News Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६,महाराष्ट्राचा आज अर्थसंकल्प, राज्यातील राजकीय घडामोडी, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध, राज्यातील राजकीय, प्रशासकीय महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

दहावी पेपर चोरी प्रकरणी गटशिक्षणाधिकारी निलंबित

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी दहावीचा परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी अंजगाव सुर्जी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले तर विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी असलेले गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

रोहित पवार आज सीआयडी कार्यालयात जाणार

आमदार रोहित पवार आज CID कार्यालयात जाणार आहेत. वी.के.सिंग यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पवार कार्यालयाला भेट देणार आहेत.

नितीन गडकरींचा आज पुण्यात पत्रकारांशी संवाद

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तयार केलेल्या पुण्यातील प्रकल्पांची माहिती गडकरी देणार आहेत. पुणेकरांच्या सोयीसाठी कुठले नवे प्रकल्प केंद्र सरकार करणार याबाबत माहिती समजेल.

दुबईत अडकलेले पुण्यातील  128 नागरिक सुखरूप परतले आहेत.  पुणे जिल्हा प्रशासनाकडे २५० नागरिक अडकल्याची माहिती असून त्यापैकी १२८ नागरिक परतले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.   अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com