Local Body Elections : महायुती फुटणार... ‘एकला चलो’ची पहिली हाक पुण्यातून!

BJP's Independent Move in Pune Municipal Elections : पुणे महापालिकेत स्वबळावर भाजपचे 105 हून अधिक नगरसेवक निवडून आणू, असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले आहे.
Mahayuti Politics
Mahayuti PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी चार महिन्यांत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षापासून नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक घेण्याच्या आदेश निघताच पुण्यातून आगामी निवडणुकीसाठी ‘एकला चलो’चा सूर भाजपमधून येताना पाहायला मिळत आहेत.

पुणे महापालिकेत स्वबळावर भाजपचे 105 हून अधिक नगरसेवक निवडून आणू, असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले आहे. गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरच निवडणुका होतील, अशी आशा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना वाटत आहे.

Mahayuti Politics
Sharad Pawar News : संरक्षणमंत्री असताना पवार साहेबांनी एक निर्णय घेतला, जो आज इतिहास घडवतोय!

निवडणुका जर महायुती म्हणून लढल्या तर उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे एकला चलोच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही झालं तरी आम्हाला पुण्यामध्ये महायुती नको, अशीच भूमिका पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये भाजपची मोठी ताकद असून स्वबळावर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते, असा विश्वास स्थानिक नेतृत्वाला वाटत आहे. पुणे शहरात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. भाजपकडून नुकतीच शहरात साडेपाच लाख प्राथमिक पक्ष सदस्यांची नोंदणी देखील पूर्ण करण्यात आली आहे. त्याबरोबर नऊ हजार सक्रिय सदस्य नोंदणीचे काम भाजपाने हाती घेतले आहे.

Mahayuti Politics
Masood Azhar Family : संसदेला टार्गेट करणाऱ्या मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; आता म्हणतोय, बरं झालं असतं मीही...

गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपची पुणे महापालिकेमध्ये एकहाती सत्ता होती. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे तब्बल 100 नगरसेवक निवडून आले होते. तसेच 2017 ला निवडणूक लढवून विजयी झालेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीला 2017 ला निवडणूक लढवून जिंकलेले असे भाजप कडे 105 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे यावेळी 105 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असं शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिले आहे. पुणे लोकसभा भाजपाने जिंकलीच मात्र विधानसभेला देखील सहाच्या सहा आमदार निवडून देत शतप्रतिशत विजय भाजपचा पुण्यात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यामुळेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेतही पुणेकर भाजपला विजयी करतील, असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com