

राज्यातील मराठवाड्यासह काही भागांत दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कल्याण डोंबिवलीचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी डोंबिवलीतील लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव यंदा रद्द केला आहे. याबाबतची माहिती आमदार राजेश मोरेंनी दिली आहे. या उत्सवासाठी होणारा दरवर्षी खर्च आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून दिला जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले काही निर्णय आणि प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण याचिका प्रथमेश गोपाळ गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लाऊड स्पीकर वापराबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोर्टानं लाउडस्पीकर लावण्यासाठी मंडळांना परवानगी घेताना 1 लाखांचं डिपॉझिट जमा करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच खासगी कार्यक्रमासाठी 50 हजार रक्कम भरावी लागणार आहे. अटींचं उल्लंघन झाल्यास डिपॉझिट जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी शिवसेना ही भाजपची एक ‘शेल कंपनी’ असल्याचा आरोप केला होता. यावर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिपकेंना जोरदार प्रत्युत्तर देताना सीजेपीला राजकारणातील नवा विदूषक म्हटलं आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, आम्ही भारतीय राजकारणातील नव्या जोकरांना सांगू इच्छितो की, शिवसेना ही कोणाचीही बनावट कंपनी किंवा प्रॉक्सी नाही. शिवसेना ही एक चैतन्यशील संघटना आहे. शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर सातत्यानं काम करते, असा पलटवार केला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रासायनिक खतांच्या गोणीत ३ ते ४ किलो खत कमी असल्याचे दिसून आले. एका हमालाने केलेल्या व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हारयल झाल्यानंतर कोरोमंडल कंपनीच्या खताच्या पोत्यात ३ ते ४ किलो वजन कमी असल्याचे आढळून आले. कंपनीविरोधात कारवाई करणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले असून हा प्रकार उजाडात आणणारे हमाल विक्रम सावंत यांना व्हिडिओ डिलिट करण्याची धमकी दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पत्रकार परिषदेतून आरोप करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपांना भारतीय जनता पक्षाकडून उत्तर देण्यात आले आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीआधी काँग्रेस नेत्याने बांगलादेशच्या वृत्तपत्रात ‘मोदी हॅज टू गो’ असा लेख का लिहिला, असा सवाल केला आहे. काँग्रेसची मदार बांगलादेशातून येणाऱ्या बोगस मतदारांवरच होती. कारण आसाममधील धुबरी मतदारसंघातून रुकीबुल हसैन हे १० लाख मतांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले आहेत, असे उदाहारणही त्यांनी दिले.
मला एक खून माफ असता तर मी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना गोळी घातली असती, असे वादग्रस्त विधान बिहारमधील व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहानी यांनी केले आहे. निवडणूक आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर सहानी यांनी हे विधान केले आहे.
मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहात महाभियोगाची नोटीस देणार आहे, अशी माहिती आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष महाभियोगाची नोटीस देणार आहेत. या नोटिशीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ती नोटिस दोन्ही सभागृहात देण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात फौजदारी अवमानाना कारवाईला परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकिल ब्रिजेश सिंह यांनी ॲटर्नी जनरल वेंकटरमणी यांना पत्राद्वारे केली आहे. बहुसदस्यीय निवडणूक आयोग एकाच व्यक्तीच्या निर्णयानुसार चालवला जात आहे, असे ब्रिजेश सिंह यांनी म्हटले आहे.
एसआयआरवरून निवडणूक आयोगात सुरू झालेल्या वादाने राजकारण तापले आहे. विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा मागणी होतेय. आता वादात कॉक्रोच जनता पक्षाने उडी घेतलीय. केंद्र सरकारला बॅकफूटवर नेणाऱ्या सीजेपीनं आता मुख्य निवडणूक आयुक्तांना ४८ तांसाचा अल्टीमेटम दिला आहे. कॉक्रोच जनता पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांच्या आत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर ज्ञानेश यांनी राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
सत्ता विरोधी लाट असताना अचानक कशी गायब झाली. त्या निवडणुकीत भाजप जिंकली कशी असा सवाल पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीवर मोठे परिणाम झाला आहे. हा फक्त मतावर नाही तर प्रत्येक भारतीयावर हल्ला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने कलिना ग्रंथालय प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष सुटका केली आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी न्यायालयाने हा निर्णय दिला. भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एका खासगी विकासकाला भूखंड अत्यंत कमी दराने भाडेपट्ट्यावर देण्यात आल्याचा आणि त्यातून कथित लाचखोरी झाल्याचा आरोप होता.
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोप केले होते. या कथित व्यवहारामुळे राज्य सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, सुनावणीनंतर विशेष एसीबी न्यायालयाने भुजबळांना या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे.
मुंबई हायकोर्टानं लाऊडस्पीकर वापराबाबत महत्त्वाचे निर्देश दिलेयत. लाउडस्पीकर लावण्यासाठी मंडळांना परवानगी घेताना 1 लाखांचं डिपॉझिट जमा करावं लागेल. तर वैयक्तिक पातळीवरच्या कार्यक्रमासाठी 50 हजार रक्कम भरावी लागेल. अटींचं उल्लंघन झाल्यास डिपॉझिट जप्त करून कायदेशीर कारवाईही करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेयत.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गाच्या संकटामुळे तसेच पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. “शेतकऱ्यांनी काळजी करू नये. अडचणीच्या या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता CJPचं पुढचे टार्गेट निवडणूक आयोग आहे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुधारणा करा, असं म्हणत सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके हे आता आंदोलनाचे संकेत दिलेत...ज्ञानेश कुमार आता तुमचे काम तमाम' अशी पोस्ट अभिजीत दिपकेंनी शेअर केली.
साहिल वाकोडे प्रकरणात काँग्रेसने आयआयटी, मुंबईसमोर आंदोलन केले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली.
राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करण्यात यावा, असे शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केले आहे.
खर्चिक जाहिरातबाजी, इव्हेंट, कार्यक्रम रद्द करावेत, दुष्काळासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करून त्यावर सर्व संबंधित माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दुष्काळी बैठकीत काजू आणि बदाम कशासाठी, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने महसुली विभागांमध्ये कॅबिनेटची बैठक तसेच विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत सुरू करावी, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी- चिपळूणमधल्या खेर्डी MIDC मधील फर्निचर कंपनीमध्ये रात्री आग लागली आहे. आगीत कोट्यावधी रुपयांचं फर्निचर जळून खाक झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आज विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव तालुक्यातील दुष्काळाचा आढावा घेणार आहेत.
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा यांनी केला आहे. धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातील व्हिडीओ ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला भीषण आग लागली. पनवेल हद्दीत ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडात डबलडेकर बसला आग लागून 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आदमापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मधील घोटाळा प्रकरणात कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. निढोरी आणि मुरगुड परिसरातील पाच जणांना जमीन खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यहार प्रकरणी अटक केली आहे. मुख्य आरोपी रागिणी खडके आणि ट्रस्टी मात्र अद्याप फरार आहेत.
२०१६ च्या शिक्षक मारहाण प्रकरणी सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. मागील सुनावणीत उपस्थित न राहिल्याने शेवटची संधी म्हणून त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्याही सुनावणीत रितू तावडे आणि अन्य काही आरोपी कोर्टात गैरहजर राहून वारंवार उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल करत असल्याच न्यायालयाकडून नमूद
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.