Maharashtra Politics Live Update : बच्चू कडू यांनी फायनान्स कंपनीला चांगलाच दणका,शेतकऱ्याच्या घराला लावलेलं कुलुप तोडलं

Political Breaking Live Headlines Updates : शिक्षक पदवीधरचा निकाल जाहीर, महाविकास आघाडीला तीन जागांवर तर महायुतीला दोन जागांवर यश, नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली,यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

बच्चू कडू यांनी फायनान्स कंपनीला चांगलाच दणका,शेतकऱ्याच्या घराला लावलेलं कुलुप तोडलं 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी फायनान्स कंपनीला चांगलाच दणका दिला आहे. त्यांनी अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील निंबा येथील गोपाल राठोड या शेतकऱ्याच्या घरावर फायनान्स कंपनीनं न्यायालयाच्या आदेशानुसार लावलेलं कुलुप हातोड्यानं तोडलं. यानंतर त्यांनी राठोड कुटुंबाला घरात प्रवेश करून तिथंच राहण्यास सांगितलं.

...पण 2029 सालापर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं!'; राज ठाकरेंची फडणवीसांसमोरच मिश्किल टिप्पणी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिग्गज नेते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एकाच मंचावर आले होते. यावेळी राज ठाकरेंच्या विधानांच्या मिश्किल टिप्पणीनं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले, “ आशिष शेलार यांनी मला सांगितलं, मी बोलावलं की, मुख्यमंत्री कार्यक्रमाला येतात. यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन, ते येत जातील. पण 2029 सालापर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं,” असं चिमटा राज ठाकरेंनी यावेळी काढला..

'आदित्य ठाकरेंचे नाव दिशा सालियन प्रकरणात आरोपी म्हणून,सीबीआयकडे त्यांच्या अटकेची मागणी करणार: खासदार म्हस्के

आदित्य ठाकरेंनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून एकनाथ शिंदे हे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदेंना अटक करा, अशी मागणी केली होती. त्यावर खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव दिशा सालियन प्रकरणात आरोपी म्हणून आहे. त्यांना अटक करा अशी मागणी सीबीआयकडे करणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात कारवाई व्हावी म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचंही म्हस्केंनी सांगितलं आहे.

मार्केटयार्डातील ३० लाखांची चोरी दडपणे भोवले; वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप निलंबित

पुणे : मार्केटयार्ड परिसरात घडलेली ३० लाख रुपयांच्या जबरी चोरीची गंभीर घटना दडपून ठेवत केवळ ‘मिसिंग’ची नोंद केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली असून, या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मुळशी तालुक्यात तातडीनं पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : मुळशी तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा सर्व बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई मदत देण्याकरिता शेती पिकांचे पंचमाने तातडीने करण्यात यावेत असे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्या आदेशानुसार मुळशी तालुक्यातील शेती पिकांचे नुकसानीचे गावनिहाय पंचनामे तातडीने करावेत असे आदेश तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी संबंधित विभागाला दिले.

आम्ही जिंकणार याचा विश्वास, म्हणूनच लढलो; आठ महिन्यापूर्वीच ठरली होती उमेदवारी - प्रतापसिंह पाटील

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आम्ही सहज जिंकणार याचा विश्वास मला होता. विद्यमान आमदार पक्ष सोडून तिकडे गेले तेव्हाच महाविकास आघाडी मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवणार हे ठरले होते. या संदर्भात आठ महिन्यापूर्वी मुंबईत शरद पवार साहेबांनी मला बोलावून घेतले होते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला पदवीधरची निवडणूक तुम्हाला लढवायची असे सांगण्यात आले होते. मी राजेश टोपे यांनी लढावे आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून मी जबाबदारी पार पाडावी, असे मी सूचवले होते. परंतु राजेश टोपे यांनी माझ्याच नावाचा आग्रह धरला आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती विजयी झालेले उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी दिली.

फायनान्सच्या कार्यालयात शेतकरी खून प्रकरणात कुबेरफल पतसंसंस्थेच्या दोन संचालकांना अटक

खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात कुबेरफल पतसंस्थाच्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक झाली आहे. पतसंस्थेचा अध्यक्ष हरप्रीतसिंघ उर्फ मंटू मेजर याला ग्वालियर मधून आणि सचिव सतपालसिंघ खालसा याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB चा छापा! मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे जाळ्यात...

पिंपरी चिंचवड महापालिकेत आज एसीबीने छापा टाकत थेट मुख्य अभियंता पदावर असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून एका ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी 19 हजार रुपयांची ओंबासे यांनी मागणी केली होती. असा आरोप ठेकेदाराने केला होता. त्याची शहानिशा करुन आज एसीबीने थेट महापालिकेच्या इमारतीत छापा टाकला. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची अन् अटकेची प्रक्रिया पार पडली जात आहे.

शशिकांत पाटील-चुयेकर यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड

'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदावर निवड केली आहे. आघाडीकडे सर्वाधिक संचालक असल्याचा दावा करत ही निवड केली असून ती कायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी; शासनाविरोधात एल्गार

रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेतमजुरांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माणगाव तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. तसेच रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत द्या या प्रमुख मागण्यांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पशुधनासाठी चारा उपलब्ध करावा आणि जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, अशाही मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून शरद पवार गटाने केल्या आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज ॲक्शन मोडमध्ये; जाग्यावर मुख्याध्यापक निलंबित

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले असून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना कार्यात कसूर केल्याने तात्काळ निलंबित केले. ही कारवाई धुळे तालुक्यातील अजनाळे येथील शाळेत करण्यात आली आहे. दादा भुसे यांनी अचानक अजनाळे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. ही कारवाई मुख्याध्यापकच शाळेत गैरहजर असल्याने तसेच विद्यार्थ्यांना व्यवस्थित गणवेश नसल्याने करण्यात आली आहे.

आमदार तानाजी सावंत यांचा मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून दम

धाराशिवमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा मुद्दा तापला असून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून दम भरला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर सहा महिने वसुली थांबवा. कुठे सील केलं तर मी स्वतः घुसेल, ते सील तोडेल. मग माझ्यावर गुन्हा दाखल करा, कोर्टाचा आदेश किंवा जीआर मला सांगू नका. मला कायदा शिकवायच्या भानगडीत पडू नका. काहीही केलं तर मी सहन करणार नाही, मराठीत सांगितलेलं कळत नसेल तर मी माझ्या पद्धतीने काय करायचे ते बघतो, असेही तानाजी सावंत यांनी म्हणत मायक्रो फायनान्स कंपनीला बजावले आहे.

युती टिकवायची की तोडायची हे भाजपने ठरवावं : अब्दुल सत्तार

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकालानंतर आता महायुतीतच खटके उडताना दिसत असून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादाचा धुरळा उडाला असून भाजप यावरून कारवाईची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती टिकवायची की नाही हे आता भाजपच्या हातात असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे पुर्णेकरांच्या घरी दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे प्रदीप पुर्णेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ते कुटुंबियांशी चर्चा करत आहेत. पुर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे.

मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांकडून शिंदे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी शिवसेनेचे ठाण्यातील टेंभीनाका परिसरात शक्तिप्रदर्शन सुरू आहे. याठिकाणी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे फलक झळकविले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह सेनेचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले

मुंबईतील विरारमध्ये एका बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळून आले आहेत. इमारतीमधील लोकांच्या तक्रारीनंतर फ्लॅट उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

'पवारांच्या उंबरठ्यावर बसणारे आता गांधीच्या उंबरठ्यावर बसलेत

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करत, “पवारांच्या उंबरठ्यावर बसणारे आता गांधींच्या उंबरठ्यावर बसलेत,” असा टोला लगावला आहे.

बंटी पाटलांनी अध्यक्ष निवडून दाखवावा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आव्हान 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपसोबत वाद असल्यामुळे पराभव झाला असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. भाजपसोबतचा वाद मिटला नाही, त्यामुळे १३ आणि १२ असा निकाल लागला.गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड होणार नाही. सतेज पाटील यांच्याकडे १३ हा आकडा असला, तरी १४ हा आकडा होणार नाही....बंटी पाटील यांना एवढे मोठे बहुमत मिळाले असेल, तर त्यांनी अध्यक्ष निवडून दाखवावा असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले आहे.

निवडणूक हरण्याची कारण शोधण गरजेची : अब्दुल सत्तार

विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीनंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली आहे. निवडणुकीत महायुतीला पाचपैकी दोन जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या.

Amazonने २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

अॅमेझॉनने आपल्या डिव्हाइसेस अँड सर्व्हिसेस विभागातील सुमारे २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं आहे. या कपातीचा सर्वाधिक परिणाम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील पदांवर झाल्याचं वृत्त आहे.

कोरमअभावी गोकुळची सभा तहकूब

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. सभेसाठी आवश्यक संचालकांची उपस्थिती पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होऊ शकली नाही.

कालवा समितीची बैठक पुण्यात सुरू

पुण्यात कालवा समितीच्या बैठकीला सुरु आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील आमदार बैठकीला उपस्थित आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरु

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्या आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमाच्या तयारीसाठी INDIA आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पी. जी., गौरव गोगोई आणि जॉन ब्रिटास यांच्यासह INDIA आघाडीचे अन्य नेते बैठकीला उपस्थित आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, सर्वपक्षीय आंदोलनाची परवानगी नाकारली

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.

रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर; २ नोव्हेंबरला मोदींची घेणार भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबरला दिल्ली दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचीही भेट घेणार आहेत.

महायुतीने आत्मचिंतन करावे - केशव उपाध्ये

पाच जागांच्या निकालानंतर तरी ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का?एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो याचा विचार करणार आहोत का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

शिवसेनेच्या हव्यासापोटी पराभव - नवनाथ बन

महायुती जिंकली असती मात्र मित्रपक्षाच्या हव्यासापोटी, तिसऱ्या जागेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जे निर्णय घेतात त्यांच्यामुळे महायुतीला फटका बसला. सचिन सानप यांना जी 10 ते 12 हजार मतं मिळाली ती पदवीधरला देखील मिळू शकली असती. मात्र, शिवसेनेच्या पाठींब्यामुळे ती मतं फिरली आणि पुणे पदवीधरमध्ये फटका बसला, असे मत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्यक्त करत पदवीधरच्या पराभवाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले.

प्रतापसिंह पाटील यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या राजकीय रणांगणात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी बाजी मारत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना धक्का दिला. तब्बल १८ हजार १२४ मतांच्या फरकाने विजय मिळवत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रतापसिंह पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. तब्बल ४५ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर गुरुवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी पाटील यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान केले.

पैठणी अन् पैशांवर शिक्षकांनी मतदान केलं - श्रीकांत देशपांडे

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकी शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे ७ हजार १७ मतं घेत पराभूत झाले . पराभव झाल्यावर देशपांडे म्हणाले, शिक्षकांची कीव करावीशी वाटते, पैठणी अन् पैशांवर शिक्षकांनी मतदान केलं. जशी लायकी तसा त्यांना प्रतिनिधी मिळतो, असे म्हणत देशपांडे यांनी शिक्षकांची लायकी काढली.

एकनाथ शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांना पोलिसांची नोटीस

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावलीये. म्हस्केंनी विरोधी पक्षातील नेत्यांना आव्हान दिला होता जर ठाण्यात येऊन एकनाथ शिंदेंवर टीका केली तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. ठाण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नरेश म्हस्केंना नोटीस दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.