Maharashtra Politics Live Update : राहुल गांधी पंतप्रधान मोदींना दिलेल्या आव्हानावर काँग्रेस नेते पवन खेरा यांची भाजपविरोधात टोलेबाजी

Political Breaking Today Live Headlines Updates : निवडणूक आयोगाने फॉर्म 6 मधून एसआयआर घोषणापत्र हटवले , दिल्लीतील आंदोलनाला दांड मारणारे काँग्रेस पदाधिकारी निलंबीत, यासह राजय आणि देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Congress Vs BJP : राहुल गांधी पंतप्रधान मोदींना दिलेल्या आव्हानावर काँग्रेस नेते पवन खेरा यांची भाजपविरोधात टोलेबाजी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या केलेल्या ट्विटबाबत काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, "तुम्ही संसदेत येतच नाही. पंतप्रधान स्वतःला इतके नाजूक समजतात की, संसदेत गेल्यानंतर कुणी आपल्याला प्रश्न विचारेल आणि त्याची उत्तरे द्यावी लागतील, अशी त्यांना भीती वाटते. तुम्ही लोकशाही देशाचे पंतप्रधान आहात. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले जाणारच आणि त्या प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यावी लागतील. तुम्ही पत्रकार परिषद घेत नाही. गेल्या 12 ते 13 वर्षांत तुम्ही एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. संसदेत येण्याचीही तुम्हाला भीती वाटते..."

Mira-Bhayandar : सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले

सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. वसईतील वर्सोवा खाडीजवळ सुरू असलेल्या टनेलच काम 200 मीटर होणार होते. मात्र 70 मीटर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. काम वेळेत पूर्ण न झाल्यास मिरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने मेहता यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

शरद पवारांना रुग्णालयातून डिचार्ज 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिचार्ज मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने डाॅक्टरांनी त्यांनी डिचार्ज दिला.

रॅलीला गैरहजर असलेल्या काँग्रेस पदाधिकारी निलंबित

दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या रॅलीला गैरहजर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक 59 जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर, हरियाणामध्ये देखील पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

निवडणूक आयोगाने फॉर्म 6 मधून एसआयआर घोषणापत्र हटवले

आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र फॉर्मची गरज नाही आता ईसीआयनेट (ECINet) पोर्टलवर नोंदणी करताना नवीन मतदारांना हे घोषणापत्र वेगळे भरावे लागणार नाही.याआधी फॉर्म ६ मध्ये या घोषणापत्राचे उत्तर देणे बंधनकारक होते.आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी यावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर आयोगाने हा मोठा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.