Rahuri Bypoll Politics : 'तनपुरेंची 'ED' केस, जयंत पाटलांचं लक्ष अन् पाठिंबा'; रोहित पवारांनी भाजपचं वाढवलं टेन्शन

Rohit Pawar claims in Sangamner that Jayant Patil is closely monitoring the Rahuri bypoll and Prajakt Tanpure is likely to support the Sharad Pawar-led NCP candidate within MVA : राहुरी पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 'मविआ'च्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी देत भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.
Rahuri Bypoll Politics
Rahuri Bypoll PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Prajakta Tanpure support NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

'या निवडणुकीवर जयंत पाटील साहेब यांचे बारकाईनं लक्ष असून, तनपुरे यांचा 'मविआ'च्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे अन् निवडून देखील येणार आहे,' असा दावा रोहित पवार यांनी केला.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी 'ED' केसमुळे निवडणूक लढली नसल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आमदार पवार म्हणाले, "'ED' केसमुळे निवडणूक लढली नाही, असे मला तसं वाटत नाही. त्यांची 'ED' केस आता संपेल, कोर्टात त्याबाबत युक्तिवाद सुरू आहे. तनपुरे यांनी का निर्णय घेतला हे, त्यांना माहित असावं.नेमकं काय झालं हे मला सांगता येणार नाही."

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे निश्चित पाठिंबा देतील आणि तो उमेदवार निवडून देखील येईल. राहुरीतील पोटनिवडणुकीवर तनपुरे यांचे मामा जयंत पाटल साहेब यांचे देखील बारकाईने लक्ष आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटलं.

Rahuri Bypoll Politics
Prajakt Tanpure BJP Entry : जयंतरावांच्या भाच्यासाठी भाजपमध्ये ‘रेस’! चव्हाण-शिंदे-कर्डिलेंची साद; विखेंचं काय?

'भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातुलनेत 'मविआ'तील शरद पवार राष्ट्रवादीकडून प्रचाराचा कुठेही गाजावाजा दिसत नाही. यावर बोलताना, रोहित पवार यांनी ही निवडणूक वेगळ्या पातळीवर लढली आहे. परिस्थिती वेगळी आहे. पोटनिवडणूक असल्याने आम्ही जास्त गाजावाज केलेला नाही. पण शरद पवार राष्ट्रवादीचे आणि मविआचे सर्व कार्यकर्ते सक्रिय आहेत,' असे रोहित पवार यांनी सांगितले.

Rahuri Bypoll Politics
Rahuri Bypoll Twist : ‘अर्ज न भरणे, हेच उत्तर!’ मंत्री विखेंच्या 'गुगली'ने तनपुरे समर्थक चक्रावले?

राहुरी अन् बारामती पोटनिवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, स्टार नेते अशी 40 जणांची फौज उतरवली होती. तुलनेत मविआकडून जास्त नेते मैदानात दिसले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. वंचितचे प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांची सभा झाली. शरद पवार यांची सभा होईल, असे सांगितले जाते होते. पण त्यांची प्रकृतीमुळे सभा झाली नाही.

शरद पवार यांच्या प्रकृतीची अपडेट देताना, रोहित पवार म्हणाले, "शरद पवार साहेबांना रुग्णालयात रेग्युलर चेकअपसाठी जावं लागतं. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पवार साहेब ठणठणीत आहेत. पुन्हा महाराष्ट्रात फिरण्याची त्यांची इच्छा आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com