MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत महायुती बाजी मारणार की मविआ धक्का देणार? एक्झिट पोलचा आकडा समोर! क्रॉस व्होटिंगने धाकधूक वाढली!

Political News : राज्यातील विधानपरिषदेच्या 11जागांसाठी गुरुवारी उत्साही वातावरणात मतदान पार पडले. यापूर्वीच राज्यातील विधानपरिषदेच्या 6 सहा जागा बिनविरोध निवडून आणत महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे.
exit polls
exit pollssarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 11जागांसाठी गुरुवारी उत्साही वातावरणात मतदान पार पडले. यापूर्वीच राज्यातील विधानपरिषदेच्या 6 सहा जागा बिनविरोध निवडून आणत महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. त्यातच राज्यातील 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असतानाच मतदान पार पडल्यानंतर केलेल्या एक्झिट पोलचा आकडा समोर आला असून काही मतदारसंघात क्रॉस व्होटिंगने धाकधूक वाढली आहे. या मतदानावेळी 'साम'ने केलेल्या Exit Poll नुसार कोणाचे पारडे जड असणार हे पुढे आले आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या 11 मतदारसंघात जवळपास सरासरी 99 ते 100 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणची मतमोजणी आता 22 जूनला होणार असल्याने आता कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विधानपरिषदेच्या या ११ जागांवर महायुती बाजी मारणार की मविआ धक्का देणार याचा 'साम'नेअंदाज वर्तवला आहे.

exit polls
MLC election : एकनाथ शिंदेंच्या 'होम ग्राउंड'वरच भाजपचा दबदबा; ठाणे-पालघरची 'आमदारकी' शिवसेनेकडून जाणार?

विधानपरिषद निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार विभागवार कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे नरेंद्र दराडे संभाव्य विजेते आहेत तर जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांचे पारडे जड असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

exit polls
MLC election : एकनाथ शिंदेंच्या 'होम ग्राउंड'वरच भाजपचा दबदबा; ठाणे-पालघरची 'आमदारकी' शिवसेनेकडून जाणार?

मराठवाड्यातील नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर यांची सरशी होणार आहे तर धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील बाजी मारू शकतात. तर परभणी हिंगोली मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सईद खान यांच्या बाजूने कौल जाण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट यांना मतदारांनी पसंती दर्शवली असल्याचा अंदाज आहे.

exit polls
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

विदर्भातील नागपूर मतदारसंघात भाजपचे राजीव पोतदार तर भांडारा-गोंदिया मतदारसंघामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्म्णकर हे बाजी मारतील, असा अंदाज आहे तर अमरावती मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे यांचे पारडे जड असू शकते असा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघात भाजपचे राजेंद्र राऊत आघाडी घेऊ शकतात तर सांगली सातारामध्ये भाजपचे धैर्यशील कदम संभाव्य विजेते असतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता मतमोजणी 22 जूनला होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

exit polls
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com