Monsoon session 2026 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजणार !

Maharashtra monsoon session News : शेतकरी कर्जमाफीसह आणखी काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे यावेळेसचे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे.
Uddhav Thackeray and other senior leaders face scrutiny over low attendance during the Maharashtra Legislature session.sar
Uddhav Thackeray and other senior leaders face scrutiny over low attendance during the Maharashtra Legislature session.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत अधिवेशनाची तारीख ठरली आहे. यावेळेस तीन आठवडे पावसाळी अधिवेशन सुरु राहणार आहे. त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसह आणखी काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे यावेळेसचे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला येत्या 22 जूनपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन तीन आठवडे म्हणजे 10 जुलैपर्यंत असणार आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो.

Uddhav Thackeray and other senior leaders face scrutiny over low attendance during the Maharashtra Legislature session.sar
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी केली आहे. परंतु, त्यामध्ये काही अटी अशा आहेत, ज्यांचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम आधी भरावी लागणार आहे, त्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांचा कर्जमाफीचा फायदा होणार आहे.

Uddhav Thackeray and other senior leaders face scrutiny over low attendance during the Maharashtra Legislature session.sar
Maratha Bhavan : धनंजय मुंडेंची अडचण वाढणार? 'मराठा भवन'च्या जागेवरून वाद पेटल्यानंतर विरोधक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे...

त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या अधिवेशनात विरोधक याच मुद्दयावरुन राज्य सरकारला घेरणार आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशन विविध कारणांनी गाजणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Uddhav Thackeray and other senior leaders face scrutiny over low attendance during the Maharashtra Legislature session.sar
Girish Mahajan News: गिरीश महाजनांविरोधात संताप; पेट्रोल-डिझेल टंचाईवरून आज जामनेरमध्ये शेतकरी रस्त्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com