Motor Vehicle Tax : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : वाहन करात दुप्पट वाढ; 'या' वाहनधारकांच्या खिशाला कात्री

Maharashtra Motor Vehicle Tax Bill 2026 : या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
Maharashtra legislature passes the Motor Vehicle Tax Amendment Bill 2026
Maharashtra legislature passes the Motor Vehicle Tax Amendment Bill 2026, increasing environmental tax on old vehicles to curb pollution.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Motor Vehicle Tax Bill 2026 : 'महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026' आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.

विधिमंडळात मंजूर केलेल्या विधेयकानुसार दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2 हजारांवर वरून 4 हजारांवर तर पेट्रोल वाहनांसाठी 3 हजारांवरून 6 हजार आणि डिझेल वाहनांसाठी हा कर साडेतीन हजारांवरून 7 हजार रूपये इतका करण्यात आला आहे. तर हे नवा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी आकारला जाणार आहे.

Maharashtra legislature passes the Motor Vehicle Tax Amendment Bill 2026
Jayant Patil : संजयकाकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं, तिकडच्या हालचाली त्यांनीच सांगितल्या : सांगली ZP अध्यक्षपदावर विजय मिळवताच जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

या कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी 160 कोटींपेक्षा जास्तीचा अतिरिक्त महसूल मिळेल. हा महसूल रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. तसंच औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी 30 लाखांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

विधेयकामुळे नागरिकांना बीएस-6 आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळणार असून राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळेल. तसंच ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तर या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिली, त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

Maharashtra legislature passes the Motor Vehicle Tax Amendment Bill 2026
PMC corporators selection : पुण्यात भाजपला मोठा धक्का, 2 स्वीकृत नगरसेवकांची संधी हुकली? कागदपत्र अपूर्ण असलेल्या नेत्यांची नावं समोर

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील पर्यावरण कर दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला असून बीएस-4 आणि उत्सर्जन मानकांपेक्षा कमी असलेल्या वाहनांमुळे अधिक वायू प्रदूषण होते. त्यामुळे अशा वाहनांवरील पर्यावरण कर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com