civic poll shocking results: शेवटच्या क्षणी गेम पलटला! अवघ्या एका मताने परभणीत ठाकरेंच्या वाघाची डरकाळी, तर गडचिरोलीत भाजपचा 'गड' कोसळला!

Maharashtra municipal election results News : एका मताने परभणी महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजयी झाला तर गडचिरोली महापालिका निवडणुकीत एका मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला.
Congress, Shivsena UBT
Congress, Shivsena UBTSarkrnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यभरातील 29 महापालिकेसाठी शुक्रवारी मतमोजणी पार पडली. यावेळी अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चित्तथरारक लढतीत विजयाच्या समीप पोहचलेल्या अनेकांना पराभव स्वीकारावा लागला तर अनेक पराभावाच्या छायेत असलेल्या उमेदवार विजयी झाले. लोकशाहीत एका मताची ताकद काय असते, हे परभणी आणि गडचिरोलीने जगाला दाखवून दिले आहे. याठिकणा लढतीत अवघ्या एक मताने कुणाला तरी 'शून्य' केले, तर कुणाला 'हिरो' केले. एका मताने परभणी महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजयी झाला तर तर गडचिरोली महापालिका निवडणुकीत एका मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला.

लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच मतदानात एका मताची किंमत काय असते, याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या महापलिका निवडणुकीत आला आहे. परभणी महापालिकेतील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे अवघ्या 1 मताने विजयी झाले. तर भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. मतमोजणीच्या दिवशी याच एका मताच्या फरकामुळे जवळपास 3 तास वाद सुरू होता.

Congress, Shivsena UBT
BJP-Shivsena News : भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या लाडक्या संभाजीनगरमधून दोन्ही शिवसेनेला 'उखाड दिया'!

परभणीच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अवघ्या 1 मताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे पोस्टल मतात विजयी झाले. या एक मताच्या फरकावर भाजपने आक्षेप घेत पुन्हा पोस्टल मतांची मोजणी सुरु करायला लावली. याच मतमोजणीवरून 16 जानेवारीला भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत मोठा वाद झाला होता. यावेळी उबाठाचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील हे देखील मतमोजणी केंद्रामध्ये दाखल झाले होते. अखेर 3 तासांच्या मतमोजणी आणि वादानंतर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी सर्व बाबी जाणून घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे यांना विजयी घोषित केले.

Congress, Shivsena UBT
Congress Politics: ‘हात’ रिकामा, बंडखोर भारी! काँग्रेसमधून बाहेर पडले, पुढे विजयी नगरसेक ठरले!

गडचिरोली येथील महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीवेळी असाच प्रकार पाहावयास मिळाला. काँग्रेसचे प्रभाग 4 ब मधील उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी भाजपचे (BJP) संजय मांडवगडे यांचा एका मताने धक्कादायक पराभव केला. या अटीतटीच्या लढतीत श्रीकांत देशमुख यांना 717 मते मिळाली, संजय मांडवगडे यांना 716 मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका मताने विजय हुकल्याने भाजप गोटात शांतता पसरली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पराभूत उमेदवार मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत निकाल जाहीर केला.

Congress, Shivsena UBT
Sharad Pawar NCP: महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला भोपळा,शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

अवघ्या एक मताच्या फरकाने विजय मिळवल्याने परभणी व गडचिरोली येथे काही ख़ुशी कही गम असे वातावरण पाहवयास मिळाले. विजयी उमेदवारांनी विजयी जल्लोष केला तर पराभूत झालेल्या उमेदवारांच्या पदरी निराशा पाहवयास मिळाली.

Congress, Shivsena UBT
Shivsena UBT News : खैरे जिंकले, दानवे हरले; महापालिकेतील पराभवाला जबाबदार कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com