CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता अर्ज केवळ ऑनलाईनच स्विकारणार

CM Relief Fund: सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
CM Relief Fund
CM Relief Fund
Published on
Updated on

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया आता पूर्णपणे बदलली असून यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नवं पोर्टलही विकसित करण्यात आलं आहे. आता केवळ या नव्या पोर्टलद्वारेच गरजूंना अर्ज करता येणार आहेत. ७ एप्रिल २०२६ पासून या नव्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळं सर्वसमान्य नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून करण्यात आली आहे.

CM Relief Fund
Assembly Election: उपमुख्यमंत्रीपदासाठी तब्बल १,००० कोटींची ऑफर! भाजप कनेक्शन आलं समोर

नवी प्रक्रिया कशी असणार?

  • सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून ७ एप्रिल २०२६ पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी जोडलेल्या सर्व रुग्णालयांना युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे.

  • यासाठी संलग्नीकृत रुग्णालयांनी आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

  • रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी संबंधित रुग्णालयांकडूनच ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

  • युजर आयडी आणि पासवर्ड नसणाऱ्या रुग्णालयांमार्फत सादर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय सहाय्यतेबाबतच्या अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही.

CM Relief Fund
Ashok Kharat case : रुपाली चाकणकरांची बहीणही चौकशीच्या फेऱ्यात? 'चार' खात्यांमुळे प्रतिभा चाकणकर SIT च्या रडारवर

दरम्यान, या बदललेल्या अर्ज प्रक्रियेनुसारच गरजुंना अर्ज दाखल करता येणार आहे, त्यामुळं त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सहज असल्याचं शासनानं म्हटलं आहे. धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला देखील याबाबतची खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण अशा रुग्णालयांमधून बऱ्याचदा मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडं अर्ज प्राप्त होत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com