Assembly Election: उपमुख्यमंत्रीपदासाठी तब्बल १,००० कोटींची ऑफर! भाजप कनेक्शन आलं समोर

West Bengal Assembly Election: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे.
West Bengal Election
West Bengal Election
Published on
Updated on

West Bengal Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. भाजपकडून एका पक्षाच्या प्रमुखाला तब्बल १,००० कोटी रुपयांची ऑफर आणि उपमुख्यमंत्रीपद देण्याची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या व्यवहाराचा एक व्हिडिओ देखील समोर आल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला आहे. सर्वाधिक खळबळजनक गोष्ट म्हणजे पीएमओतील एका व्यक्तीशी यासंदर्भात चर्चा झाली असून भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी यासंदर्भात संपर्क झाल्याचाही आरोप तृणमूल करुन करण्यात आला आहे.

West Bengal Election
Puducherry Neela Robot: साडी नेसून मतदान केंद्रात आली ‘रोबोट नीला’, सगळेच झाले थक्क! निवडणूक आयोगाचा भन्नाट प्रयोग

पश्चिम बंगालमधील आम जनता उन्नयन पार्टीचे प्रमुख हुमायूं कबीर यांनी भाजपकडं १००० कोटी रुपयांची मागणी केली आहे. विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे यासाठी कबीर यांच्या संपर्कात होते, असा दावा तृणमूल काँग्रेसनं केला आहे. कबीर यांचा हा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामुळं पश्चिम बंगालमध्ये एक नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. या व्हिडिओ क्लीपमध्ये म्हटलं गेलं आहे की, ते भाजपच्या नेत्यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी काम करत आहेत. पण या व्हिडिओची पुष्टी करण्यात आलेली नाही.

पत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ

फिरहाद हकीम, अरुप बिस्वास आणि कुणाल घोष यांनी पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ दाखवला. सत्ताधारी पक्षानं आरोप केला की, भाजप धर्माच्या आधारे राजकारण करत आहे. तसंच हुमांयू कबीर यांच्यावर मुस्लिम मतांच्या विभाजनाचा आरोप लावण्यात आला आहे. हा व्हिडिओ त्या विविध प्रकारांचं उदाहरण आहे ज्याद्वारे भाजप निवडणुकीतील हेराफेरी करत आहे. भाजपच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी 'बी टीम' आणि 'सी टीम' तयार करत आहे. ते मुस्लिम मतांना विभाजित करण्यासाठी हुमायूं कबीर सारख्या लोकांचा वापर करत आहेत.

घोष यांनी पुढे म्हटलं की, या व्हिडिओमध्ये हुमायूं कबीर यांचा पर्दाफाश होतो. यामध्ये ते म्हणतात की, त्यांना १००० कोटी रुपये मिळणार आहेत. तसंच यामध्ये पंतप्रधान कार्यालयाचा देखील समावेश आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की, ते पीएमओतील कोणत्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करत होते. सर्वांची ओळख पटली पाहिजे तसंच आम्हाला चौकशीची गरज आहे. ईडीनं हुमायूं कबीर यांना नोटीस पाठवायला पाहिजे, त्यांची चौकशी व्हायला हवी. ईडी पैशांच्या व्यवहारांची चौकशी करते, या ठिकाणी पैशांचा व्यवहार असून त्यांना याची चौकशी करायला हवी.

West Bengal Election
Baliram Hiray College : विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ, बळीराम हिरे महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

भाजपकडून कबीर यांचा वापर - हाकीम

दरम्यान, हाकीम यांनी म्हटलं की, "ते बंगालचा अपमान करत आहेत. भाजप हुमायूं कबीरचा वापर करत आहे. जे पक्ष बदलण्यात माहीर आहेत. कथित व्हिडिओ हुमायूं कबीर म्हणतात की, मुसलमान खूपच भोळे असतात, त्यांना मुर्ख बनवणं सोप आहे. मला ममतांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून हटवायचं आहे. यासाठी मी सुवेंदू अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाची भेट घालून देण्याचं आश्वासन दिलं आहे. मी पंतप्रधान कार्यालयाशी देखील संपर्कात आहे. त्यांनी पुढे असंही म्हटलंय की, ममता बॅनर्जींवर विश्वास करणारे हिंदू हे जाणतात की ९० ते १०० टक्के मुस्लिम समर्थन त्यांच्याच सोबत आहे. त्यामुळं जर मुस्लिम मंत त्यांच्याबाजूनं गेली तर हिंदूंना हे कळेल की ममता बॅनर्जी आता सत्तेत राहणार नाहीत. त्यानंतर त्यांच्याजवळ केवळ एकच पर्याय शिल्लक राहिल तो म्हणजे भाजप"

ही तर लाजीरवाणी घटना - हकीम

फिरहाद हकीम यांनी म्हटलं की, "ही घटना अंत्यत लाजीरवाणी घटना असून व्हिडिओ हे स्पष्टपणे दिसतंय की, मतं खरेदी-विक्रीसाठी धार्मिक भावनांचा वापर केला जात आहे. एका मशीदीच्या नावावर ते लोकांच्या भावनांचा सौदा करत आहेत. ते १००० कोटी रुपये आणि ३०० कोटी रुपयांचा अॅडव्हान्स मागत आहेत. त्यामुळं मुस्लिम समुदाय खरंच इतका मूर्ख आहे का? कोणीही त्यांच्या धार्मिक भावना विकू पाहतोय आणि ते गप्प आहेत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com