Onion Price : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! सरकारने वाढवला 250 रुपयांनी खरेदी दर

Onion Procurement Price Hiked : कांद्याला भाव मिळत नसल्याने खचलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Onion Procurement Price Hiked
Onion Procurement Price HikedSarkarnama
Published on
Updated on

Government Onion Purchase Scheme : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगाम २०२६ साठी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कांद्याची खरेदी २ हजार १२५ रुपये प्रतिक्विंटल दराने केली जाणार आहे. तर यापूर्वी कांद्याची खरेदी १ हजार ८७५ रुपये प्रतिक्विंटल दराने केली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत होते. यामुळे ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवत मे महिन्यात याची सुरुवात केली. तर सुरुवातीला १ हजार २३५ रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात आला. मात्र, शासकीय दर खुल्या बाजारापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती.

मागील दोन महिन्यांत केवळ ७ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला. त्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा खरेदी का वाढत नाही, याचा आढावा घेतला. यात बाजार समितीमध्ये अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले.

Onion Procurement Price Hiked
Onion Price Crisis : 1287 किलो कांद्याची पट्टी 1468 रुपये; शेतकऱ्याला खिशातूनच द्यावे लागेल 301 रुपये वाहनभाडे, शेट्टींनी देवाभाऊंना सुनावले

यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने आदेश जारी करत कांदा खरेदी दरात २५० रुपयांची वाढ केल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी दरात १३ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Onion Procurement Price Hiked
Onion Price Issue : कांदा उत्पादकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : केंद्राकडून आजपासूनच 'या' दराने खरेदी सुरू

तसेच या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सुधारित दर ४ जुलै २०२६ पासून लागू झाले आहेत. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारने ३ हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com