Onion Price Crisis : 1287 किलो कांद्याची पट्टी 1468 रुपये; शेतकऱ्याला खिशातूनच द्यावे लागेल 301 रुपये वाहनभाडे, शेट्टींनी देवाभाऊंना सुनावले

Raju Shetti News : कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संकटात सापडले असून राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
Raju Shetti-Devendra Fadnavis
Raju Shetti-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 May : राज्यात कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहन भाड्यापोटी स्वतःच्या जवळचेच पैसे द्यावे लागत आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विषय मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘देवाभाऊ कांदा व्हॉटसअप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर विकत घ्यायचा नाही, तर शेतकऱ्यांना विकत घ्यायचा होता,’ अशी आठवण करून दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपल्या सोशल अकाउंटवरून सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समोर केलेल्या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देवाभाऊ कांदा (onion) व्हॅाटसअप , इन्स्टाग्राम व फेसबुकवर विकत घ्यायचा नाही, तर तो शेतकऱ्याकडून विकत घ्यायचा होता. देवाभाऊ ऊर बडवून सांगत आहेत, राज्य सरकार कांदा 12 रूपये 35 पैसे किलोने खरेदी करत आहे.

Raju Shetti-Devendra Fadnavis
Prasad Lad : ‘कोण कुठला प्रसाद लाड...? आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्‌ उपोषणाला बसावं’

सोलापूर जिल्ह्यातील शशिराव तोदेकर या शेतकऱ्याने 1287 किलो कांदा 1468 रूपयांना विकला. त्या शेतकऱ्याचे हमाली, तोलाई, वाहनभाडे मिळून एकूण 1769 रूपये खर्च झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यालाच जवळचे 301 रूपये द्यावे लागले आहेत. या शेतकऱ्याचा कांदा सरासरी 1 रूपये 14 पैसे किलोने विकला गेला आहे. देवाभाऊ नेमकं कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करताय की व्यापाऱ्यांचा हे जरा जनतेला सांगा, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetti-Devendra Fadnavis
Shivendrraje : ‘पूर्वीचं सगळं विसरा; तुम्ही आता भाजपचे नगरसेवक आहात, हे लक्षात ठेवा’

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील गुलाब केशव निकम या शेतकऱ्याने कोसळलेल्या बाजारभावमुळे आपले जीवन संपवले आहे, त्यामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. राज्य सरकार आता यावर काय तोडगा काढणार, याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com