Gokul Dairy Election : मुन्ना महाडिकांच्या स्टेजवर 'गोकुळ'ची रणनीती, मंत्री मुश्रीफांच्या उपस्थितीने गेम पलटणार?

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचा महत्त्वाचा समजला जाणारा आणि अर्थकारण आणि राजकारणाचा केंद्रबिंदू समजला जाणारा गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्टेजवरूनच आखली आहे.
CM Fadnavis and DCM Shinde Intervene in Gokul Dairy Elections
CM Fadnavis and DCM Shinde Intervene in Gokul Dairy ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 26 Aug : कोल्हापूर जिल्ह्याचा महत्त्वाचा समजला जाणारा आणि अर्थकारण आणि राजकारणाचा केंद्रबिंदू समजला जाणारा गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्टेजवरूनच आखली आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीतील एकत्र आलेले सर्व नेते त्याचे संकेत समजले जातात. मागील निवडणुकीत हेच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत होते. तर महाडिक गट एकाकी पडला होता. मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र आलेले नेते आता गोकुळच्या निवडणुकीत एकत्र दिसणार आहेत.

चार वर्षांपूर्वी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतंत्र पॅनेल उभारलं होतं. त्याला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नरके, डॉ. विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह सर्व महाडिक विरोधकांनी साथ दिली. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचे पडसाद ‘गोकुळ’मध्येही उमटले.

त्यातून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे सध्याच्या घडीला एकाकी पडल्याचे चित्र आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळ्यात सतेज पाटील वगळता सर्वच नेत्यांनी महाडिक यांच्या स्टेजवर हजेरी लावली होती.

तर सोमवारी जनसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत असलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल व राजेश यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने गोकुळमध्ये राहुल पाटील देखील महायुतीसोबत असणार आहेत. गेली चार वर्षे संघाच्या कारभारावर टीका करणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही आपली भूमिका बदलल्याचे दिसते.

CM Fadnavis and DCM Shinde Intervene in Gokul Dairy Elections
Alandi Metro Extension : माऊलींच्या भक्तांसाठी खुशखबर! पुण्याची मेट्रो आळंदीपर्यंत आणण्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन

राज्यात महायुती सत्ता आल्यानंतर त्यांनी गोकुळच्या कारभारावर होत असलेली टीका थंड केली. शिवाय संघाच्या तालुकानिहाय होणाऱ्या संपर्क सभांतील त्यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. अशातच मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक या आता संघाच्या विरोधात नसतील, असे वक्तव्य केले, त्याला महाडिक यांच्याकडून प्रत्युत्तर दिले गेले. पण, कालच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात अन्य निवडणुकीपेक्षा ‘गोकुळ’वरच जास्त चर्चा झाली.

विधानसभेची किनार

‘गोकुळ’च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात मोट बांधली. त्याला सर्वांनीच साथ दिली. पण, आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘गोकुळ’मध्ये आमदार पाटील यांना ज्यांनी साथ दिली, त्यात पालकमंत्री आबिटकर, नरके, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार संजय मंडलिक यांच्याच विरोधात रान उठवले.

या सर्वांना ‘गोकुळ’ पेक्षा आपली आमदारकी, खासदारकी महत्त्वाची आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या विरोधात लढलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी सहा महिन्यांतच पक्ष बदलला. त्यामुळे ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीला लोकसभेसह विधानसभा निवडणुकीची किनार असणार आहे.

CM Fadnavis and DCM Shinde Intervene in Gokul Dairy Elections
Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिला डाव टाकला; जरांगेंसाठी ओएसडी राजेंद्र साबळे यांच्याकडे पाठवला निरोप

मुश्रीफांना अंदाज आला, सतेज पाटलांना टार्गेट केले

राज्यात महायुतीचे सरकार आल्यावरबी मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे मित्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची साथ सोडली नाही. गोकुळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांच्या आशीर्वादामुळेच मागील काही वर्षात सतेज पाटील यांचा राजकीय करिष्मा पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर देखील मंत्री मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेतली होती.

मात्र, जस जशी गोकुळ दूध संघाची आणि स्थानिकच्या निवडणुका जवळ येत आहेत. तस तसं राज्यातील महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे धोरण राज्य सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे अंदाज आलेल्या मंत्री मुश्रीफ यांनी आतापासूनच मित्र सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सुरू केले आहे. महायुती म्हणून या सर्व निवडणुकीला एकत्र जाणार असून सर्वच निवडणुकीत यांची एकी दिसणार आहे. त्यामुळे सावध झालेल्या मंत्री मुश्रीफ यांनी विविध मुद्द्यांवरून थेट सतेज पाटलांच्या वरच टीका सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com