Maharashtra Deputy CM : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाच्या आणखी जवळ; गटनेता निवड अन् शपथेपूर्वीच खासदारकी सोडली

Political News : राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शनिवारी सायंकाळी पाच वाजता शपथ घेणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत पोहचल्या आहेत. त्यामुळे शनिवारी दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शनिवारी सायंकाळी पाच वाजता शपथ घेणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.

शनिवारी सकाळपासूनच मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Prafull Patel), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या ज्येष्ठ नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री पद, राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षाच्या वाट्याला येणार असलेल्या खात्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.

Sunetra Pawar
Ajit Pawar : अजितदादांनी शेवटची सही 'या' फाइलवर; आमदारांना मिळणार ताकद!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांची दुपारी दोन वाजता बैठक होणार असून या बैठकीत विधिमंडळाचा नेता निवडला जाणार आहे. या निवडीनंतर त्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली असून एका साध्या समारंभात त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Sunetra Pawar
Ajit Pawar: पवार नावाचा वारसा अजून जिवंत आहे! राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच; नाशिकच्या नेत्यांनी घेतला भावनिक पुढाकार

खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांचा खासदारकीचा राजीनामा शनिवारी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवून दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुनेत्रा पवार यांनी गटनेता निवड अन् शपथेपूर्वीच खासदारकी सोडली आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Sunetra Pawar
BJP News : भाजप मतदानापूर्वीच सत्तेच्या जवळ : बहुमतासाठी फक्त 2 जागांची गरज; पण, त्यासाठीही विरोधकांचीही टाईट फिल्डिंग

या सर्व प्रक्रियेपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा (खासदारकीचा) राजीनामा दिला असल्याचे समजते. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Sunetra Pawar
Ajit Pawar Death : दादांची शेवटची सही सुद्धा स्मशानभूमीच्या कामासाठी, दुर्दैवी योगायोग सांगताना सरोज अहिरेंना अश्रू आवरेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com