Teachers Salary: दिवाळीपूर्वीच शिक्षकांचे पगार, पेन्शन जमा करा! शिक्षण संचालनालयाचा आदेश; विलंब झाल्यास कारवाई

Teachers Salary Before Diwali: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन व मानधन अदा करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सर्व यंत्रणांना तातडीचे निर्देश, अन्यथा कारवाईचा बडगा उगारणार
Teachers Salary Before Diwali:
Teachers Salary Before Diwali AI
Published on: 
Updated on: 

Pune News: यंदाच्या दिवाळी सणापूर्वी राज्यभरातील सर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि अंशकालीन निर्देशकांच्या मानधनाची रक्कम तातडीने द्या, असा सक्त आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा मानधन प्रलंबित राहिल्यास प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात आणि विधिमंडळातही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, या गंभीर बाबीची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना हे विशेष पाठवले आहे.

अडचणी टाळण्यासाठी वेतनाची अग्रक्रमाने पूर्तता

दिवाळीपूर्वी वेतनाची देयके अदा न झाल्यास कर्मचारी संघटनांकडून तीव्र निषेध व निवेदने सादर केली जाण्याची दाट शक्यता असते. एवढेच नव्हे तर, विधिमंडळाच्या कामकाजात या मुद्द्यावर तारांकित व अतारंकित प्रश्न उपस्थित होऊन नाहक प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होऊ शकते आणि विभागाची प्रतिमा मलिन होऊ शकते, असा इशाराही या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. हीच बाब गांभीर्याने घेत कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन, निवृत्तीवेतन किंवा मानधन सणापूर्वी रखडणार नाही, याची सर्वोच्‍च दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Teachers Salary Before Diwali:
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना मोठी अपडेट! SC प्रवर्गातील महिलांसाठी 344 कोटींचा निधी मंजूर; सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार?

निधी वितरीत

नियमित वेतन, निवृत्तीवेतन, कंत्राटी शिक्षकांचे मानधन तसेच अंशकालीन निर्देशकांच्या मानदानासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद आधीच वितरीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उपलब्ध निधीचा योग्य विनियोग करून प्रत्यक्ष वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Teachers Salary Before Diwali:
School Assessment Rules: 1ली ते 8 वीच्या मूल्यमापन पद्धतीत मोठे बदल: SCERT कडून नव्या मार्गदर्शक सूचना, कला शिक्षण, 6 वी व्यावसायिक शिक्षणासाठी नवे नियम

वेळेत अंमलबजावणी न झाल्यास कारवाईचा बडगा

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या या आदेशाला 'सर्वोच्च प्राधान्य' देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीच्या आनंदावर कोणतीही विरजण पडू नये आणि कर्मचाऱ्यांना वेळेत आर्थिक लाभ मिळावेत, यासाठी क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी व वेतन पथक प्रमुखांनी जातीने लक्ष घालून ही कारवाई ताबडतोब पूर्ण करावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.

Teachers Salary Before Diwali:
Drought Relief Subsidy 2026: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची मदत! कोणाला पैसे मिळणार, कोण वंचित राहणार; निकष काय?
  • दिवाळीपूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्देश.

  • निवृत्तीवेतनधारक आणि अंशकालीन निर्देशकांचे पेन्शन व मानधनही वेळेत देण्याचे आदेश.

  • वेतन वितरणात विलंब होऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश; अन्यथा कारवाईचा इशारा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com