Disaster Management: विद्यार्थ्यांसाठी सरकारचा 20 कोटींचा प्लॅन! QR कोड अन् कार्टूनमधून शिकणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Maharashtra Government, Disaster Management: शालेय विद्यार्थ्यांसाठी 'आपत्ती व्यवस्थापन' बाबत नवीन पाऊल: इयत्ता ७ वी आणि ८ वीच्या मुलांसाठी २० कोटी रुपयांची विशेष पुस्तिका तयार होणार
Disaster Management, Maharashtra Government
Disaster Management, Maharashtra GovernmentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Education News: शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्याची तयारी व त्याविषयीचे प्रबोधन व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, राज्य सरकारच्या पूर्वतयारी व क्षमताबांधणी घटकांतर्गत इयत्ता ७ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनविषयक एक सर्वसमावेशक पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल २० कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

बदलत्या जागतिक हवामानामुळे, पर्यावरणीय बदलांमुळे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे गेल्या काही वर्षांत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वारंवारतेमध्ये तसेच तीव्रतेमध्ये मोठी वाढ झाली आहे. या आपत्तींचा मानवी जीवनमानावर आणि सामाजिक व्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच आपत्ती धोके व्यवस्थापनाची संस्कृती रुजवणे आणि त्यांना भावी काळातील एक जबाबदार नागरिक बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांसोबतच पालक व सर्वसामान्य नागरिकांमध्येही आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Disaster Management, Maharashtra Government
Maratha Startup Scheme: मराठा-कुणबी तरुणांना दरमहा मिळणार 25 हजार रुपये! स्टार्टअपसाठी अर्ज करा; कोणती कागदपत्रे लागणार?

पुस्तिकेची वैशिष्ट्ये आणि आकर्षक मांडणी

विद्यार्थ्यांना हा विषय अधिक रंजक, सोपा आणि आकषर्क वाटावा, यासाठी या पुस्तिकेची रचना अतिशय आधुनिक पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे:

पुस्तकातील सर्व माहिती इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरक्रमानुसार मांडली जाईल, ज्यामुळे माहिती सहज शोधता येईल. एका अक्षराखाली एकापेक्षा अधिक आपत्तींचा समावेश केला जाईल; उदाहरणार्थ 'सी' अक्षराखाली थंडीची लाट (Cold Wave) आणि ढगफुटी (Cloud Burst) अशी रचना असेल.

प्रत्येक आपत्तीची माहिती सुमारे २०० ते ४५० शब्दांच्या व्याख्येत दिली जाईल. यामध्ये आपत्तीपूर्व तयारी, आपत्ती काळातील उपाययोजना आणि आपत्तीनंतरची पुनर्बाधणी या सर्व टप्प्यांचा सविस्तर आढावा घेतला जाईल.

Disaster Management, Maharashtra Government
Shikshan Sevak Salary: शिक्षणसेवकांच्या मानधनात 20 हजारांची वाढ होणार? शिक्षण संचालकांचा सरकारकडे प्रस्ताव; निर्णयाकडे लक्ष

* आपत्तीच्या प्रकारानुसार काय करावे (Do's) आणि काय करू नये (Don'ts), तसेच आजवर घडलेल्या मोठ्या व भीषण आपत्तींची माहिती यात समाविष्ट असेल.

* पुस्तकातील आशय हा पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याचा प्रभावी संदेश देणारा असेल. शिक्षण, संवाद आणि संपर्क या मुद्द्यांना धरून ही मांडणी केली जाईल.

* विद्यार्थ्यांना या विषयाचे आकर्षण वाटावे यासाठी एक विशेष कार्टून पात्र विकसित केले जाईल. तसेच माहिती सहज समजावून सांगण्यासाठी कथाकथन (Storytelling) पद्धतीचा वापर केला जाईल.

* प्रत्येक आपत्तीचे इन्फोग्राफिक पाहण्यासाठी आणि पुस्तकाच्या प्रस्तावना पृष्ठावर संपूर्ण पुस्तकाचा सारांश सांगणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणासाठी QR कोड देणे बंधनकारक राहील.

* विद्यार्थी हे 'आपत्तीदूत' म्हणून कुटुंबापासून समाजापर्यंत जागृती घडवून आणतील, असा यामागील मूळ उद्देश आहे.

या सर्व घटकांना शालेय शिक्षण मार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घेतले जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार भागवला जाणार असून, वित्त विभागाच्या मान्यतेने यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.