SET Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : SET परीक्षा लांबणीवर; पुणे विद्यापीठाकडून नवी तारीख जाहीर

Maharashtra SET Exam Deferred Due to MPSC and Wari : सेट परीक्षा २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षार्थींना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने ती पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
SET Exam 2026 date announced
SET Exam 2026 date announcedSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra SET Exam News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता २६ जुलै रोजी होणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून बहुप्रतीक्षेत असणारी सेट परीक्षा आणखी लांबली आहे. तर २६ जुलै रोजी होणारी सेट परीक्षा आता सहा सप्टेंबरला होणार आहे.

महाराष्ट्रासह गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी ही सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येते. विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा राज्य सरकारची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे.

त्यानुसार, विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन २६ जुलै रोजी करण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीकरिता विविध विषयांच्या परीक्षा २६ जुलै रोजी आयोजित केल्या आहेत.

SET Exam 2026 date announced
SET Exam Date 2026 : सेट परीक्षेची तारीख अखेर जाहीर! 'या' दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर...

दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे. तसेच ७ ते २५ जुलै या काळात आषाढी वारी आहे. दरम्यान, सेट परीक्षा २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि परीक्षार्थी वेळेत परीक्षेस पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर २६ जुलैला होणारी सेट परीक्षा पुढे आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांची निवेदने प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी २६ जुलैला आयोजित केलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख सहा सप्टेंबर जाहीर करण्यात येत आहे.

SET Exam 2026 date announced
SET Exam Result : पुणे विद्यापीठाकडून 'SET'चा अधिकृत निकाल जाहीर

काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम तारीख पुढील १५ दिवसांत सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या सेट विभागाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com