Pune Metro : पुणेकरांच्या नशिबी पुन्हा 'तारीख पे तारीख'; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही हिंजवडी मेट्रोला आता नवा मुहूर्त!

Pune Metro Hinjawadi phase delay reason : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला पुन्हा विलंब. पुणेकरांच्या प्रतीक्षेला नवा मुहूर्त, नागरिकांमध्ये नाराजी वाढली.
Pune Metro Shivajinagar to Hinjawadi
Pune Metro Shivajinagar to Hinjawadi Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यामध्ये फेज थ्री हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग लवकरच खुला होईल असा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या महिन्यांमध्ये पुण्यात येऊन दिलं होतं. तसेच या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा कधी पूर्ण होणार याबाबतचा मुहूर्त देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र हा मुहूर्त हुकणार असल्याचा समोर आला आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान धावणाऱ्या मेट्रो मार्गिका ३ चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. २३ स्थानकांचा समावेश असलेला हा २३ किमीचा मार्ग पीएमआरडीएकडून खासगी भागीदारीतून विकसित केला जात आहे. नियोजित मार्च २०२५ ची मुदत उलटून गेल्याने या प्रकल्पाला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे."

Pune Metro Shivajinagar to Hinjawadi
child abuse case : 'दगडाने ठेचलं अन्', 65 वर्षाच्या नराधमाचा तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, ओलांडली क्रूरतेची सीमा; पुण्याच्या 'त्या' घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम!

महिन्याभरापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की, आयटी अभियंत्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होईल.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' या उक्तीप्रमाणे, काम वेळेत पूर्ण न झाल्याने 15 मे चा उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला असल्याचा समोर आला आहे. त्यामुळे आणखी काही महिने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

हिंजवडी आयटी पार्कला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही मेट्रो लाईन 'लाईफलाईन' ठरणार आहे. सध्या माण ते हिंजवडी आणि शिवाजीनगर या प्रवासात तासनतास वाया जातात. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही काम रखडल्याने आता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

का रखडला मुहूर्त?

मेट्रो मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील काही तांत्रिक कामे आणि स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम अद्याप बाकी आहे. सुरक्षिततेच्या चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय मेट्रो धावू शकत नाही. परिणामी, मे महिन्याची डेडलाईन पाळण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे.

Pune Metro Shivajinagar to Hinjawadi
Criminal history : 'राक्षस नाही, तर 'सैतान' आहे हा आरोपी; चिमुरडीचा बळी घेणाऱ्या गुन्हेगाराचा थरकाप उडवणारा भूतकाळ!

आता १५ जूनची 'डेडलाईन'

१५ जूनपासून मेट्रो सुरू होईल, असे नवे आश्वासन आता दिले जात आहे. २३ किलोमीटरच्या या मार्गावर आता १५ जूनपासून पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांवर सेवा सुरू करण्याचे नियोजन 'पीएमआरडीए'ने केले आहे, तर पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. मात्र, पावसाळा तोंडावर असताना हे काम पूर्ण होणार की पुन्हा एकदा 'पाऊस' आणि 'तांत्रिक अडथळ्यां'चे कारण पुढे करून पुणेकरांना वाऱ्यावर सोडले जाणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com