Sugarcane Crushing Season: मराठवाडा, नगर, सोलापूरमधील कारखान्यांची धुराडी पेटली : स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर हंगाम अडचणीत!

Maharashtra Sugar Mill: महाराष्ट्रात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामात १३१ साखर कारखान्यांना परवाने मिळाले असून ५० हून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनामुळे गाळप रखडले आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra sugar factories News : राज्यात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ५० हून अधिक साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अहिल्यानगर, सोलापूर आणि मराठवाड्यातील कारखान्यांनी गाळप सुरू केले असले, तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगामाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. एकीकडे पाण्याअभावी ऊस वाळण्याची भीती, तर दुसरीकडे मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने शेतकरी आणि साखर कारखानदारांची कोंडी झाली आहे.

राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार साखर कारखान्यांची तयारी सुरू झाली. साखर आयुक्तालयाने सोमवार अखेर १९ ऑक्टोबर ला १३१ कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. मात्र, परवाने मिळालेले सर्व कारखाने प्रत्यक्षात सुरू झालेले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनामुळे गाळपाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.

आंदोलनाचा तिढा कायम; पश्चिम महाराष्ट्रात गाळप रखडले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम रखडला आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अद्याप संयुक्त बैठक झालेली नाही. त्यामुळे कारखाने सुरू करण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दुसरीकडे, राज्यातील काही भागांत पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस वाळण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऊस वेळेत गाळपासाठी न गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे वाळण्याच्या मार्गावर असलेल्या उसाला प्राधान्याने गाळपासाठी घेण्याची मागणी होत आहे. मात्र, आंदोलन आणि गाळपातील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Sugarcane Crushing Season
PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘सूर्यवंशी पॅटर्न’चा धडाका; 7 महिन्यांत रेकॉर्डब्रेक सस्पेन्शन, 11 जणांना घरचा रस्ता

८१ कारखान्यांना परवान्यांची प्रतीक्षा

यंदाच्या हंगामासाठी राज्यातील १०४ सहकारी आणि १०८ खासगी, अशा एकूण २१२ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ६७ सहकारी आणि ६४ खासगी, अशा १३१ कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत. अद्याप ८१ कारखान्यांना परवाने मिळणे बाकी आहे.

Sugarcane Crushing Season
Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, दसरा मेळाव्यापूर्वीच आमदाराची इच्छा बाहेर.. चर्चांना पुन्हा हवा

त्यामुळे परवाने मिळणे, ऊसतोड कामगारांची उपलब्धता आणि शेतकरी संघटनांच्या आंदोलनावर तोडगा निघणे, या बाबींवरच आगामी गाळप हंगामाचे चित्र अवलंबून राहणार आहे. कारखान्यांची धुराडी पेटली असली, तरी पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाचा धूर कधी निवळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com