Teacher Strike : ‘एसआयआर’च्या कामामुळे शिक्षक संतप्त! 9 जुलैला राज्यभर शाळाबंदचा इशारा; निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका

Teachers across Maharashtra announce statewide school shutdown July 9, protesting against Election Commission SIR voter list verification campaign and increasing BLO workload : महाराष्ट्रात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेला सुरुवात होताच राज्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उसळली आहे.
Teacher Strike
Teacher StrikeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra School Closed News : महाराष्ट्रात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेला सुरुवात होताच राज्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उसळली आहे.

शैक्षणिक कामकाजासोबतच शिक्षकांवर बीएलओ (Booth Level Officer) म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात असल्याने शिक्षक मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप विविध शिक्षक संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षक संघटना थेट निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाल्या असून 9 जुलै रोजी राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरांतील शाळा मोठ्या प्रमाणात बंद ठेवण्यासाठी शिक्षक (Teacher) संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या आंदोलनात राज्यातील तब्बल 15 हजारांहून अधिक शिक्षक सहभागी होणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आंदोलनात राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र (Maharashtra) टीईटी-सीटीईटी उत्तीर्ण वरिष्ठ शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघटना आणि इतर समविचारी संघटना एकत्र आल्या आहेत. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या संघटनांनी संयुक्त आंदोलनाची घोषणा केली आहे.

Teacher Strike
Teacher Promotion Order : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी! पदोन्नती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती; अण्णा बनसोडेंचे थेट आदेश

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे नेते केशवराव जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांबाबत शासन सातत्याने अन्यायकारक आणि जाचक निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षक संघटनांनी अनेकदा लोकशाही मार्गाने मागण्या मांडल्या, मात्र सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Teacher Strike
Teacher Dies During Election Duty : मतदारयादीच्या कामाचा जीवघेणा ताण? बीएलओ ड्युटीवर असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू, शिक्षक संतप्त

दरम्यान, शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाच्या 14 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नतीसंदर्भातील वादग्रस्त पत्रावरही आक्षेप घेतला आहे. हे पत्र तात्काळ रद्द करून संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या पदोन्नत्याही रद्द कराव्यात, अशी ठाम भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे.

एकीकडे निवडणूक आयोगाची एसआयआर मोहीम आणि दुसरीकडे शिक्षकांचा वाढता रोष यामुळे राज्यातील शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. 9 जुलैचे आंदोलन आता सरकारसाठी मोठे राजकीय आणि प्रशासकीय आव्हान ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com