Teacher Promotion Order : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी! पदोन्नती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती; अण्णा बनसोडेंचे थेट आदेश

Big relief for senior teachers as Maharashtra government promotion process faces temporary suspension amid growing controversy : ज्येष्ठ शिक्षकांवर अन्यायाच्या तक्रारीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Teacher Promotion Order
Teacher Promotion OrderSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Teacher Latest News : राज्यातील हजारो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिक्षक संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संभ्रम आणि ज्येष्ठ शिक्षकांवर होत असलेल्या संभाव्य अन्यायाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यभरातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेच्या पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

यासंदर्भात अण्णा बनसोडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये (Teacher) मोठी खळबळ उडाली असून पदोन्नती प्रक्रियेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक पदोन्नतीसंदर्भात वेगवेगळे शासन निर्णय, नियम आणि प्रशासकीय आदेश जारी होत असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विशेषतः अनेक ज्येष्ठ शिक्षकांचे पदोन्नतीतील हक्क डावलले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी थेट हस्तक्षेप करत प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Teacher Promotion Order
Thailand Job Scam : थायलंडच्या नोकरीच्या आमिषामागे मृत्यूचा सापळा; बीडच्या युवकाचा पत्नीला थरारक फोन, 800 भारतीय म्यानमारच्या जंगलात ओलीस!

अण्णा बनसोडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून पदोन्नती प्रक्रियेबाबत एकमताने आणि सुस्पष्ट असा अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणतीही पुढील प्रशासकीय कार्यवाही, आदेश अथवा अंमलबजावणी केली जाऊ नये. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेला मोठा ब्रेक लागला आहे.

Teacher Promotion Order
Uddhav Thackeray Shirdi Visit : शिर्डीत उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का? निष्ठावान शिवसैनिक रावसाहेब खेवरेही सोडणार साथ; शिंदे शिवसेनेत जाण्याचे संकेत

टीईटीसंदर्भातील निर्णयांमुळे नियमांविषयी गोंधळ

दरम्यान, राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा पदोन्नती समिती (DPC) बैठकीच्या दिनांकाला पात्रता पूर्ण करणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी जारी केलेल्या पत्रात काही निर्देश दिले होते. मात्र विविध शासन निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटीसंदर्भातील निर्णयांमुळे नियमांविषयी गोंधळ अधिक वाढला होता.

पुनर्विचार होण्याची शक्यता

विशेष म्हणजे ज्या जिल्हा परिषदांमध्ये 1 सप्टेंबर 2025 पर्यंत DPC बैठका झालेल्या नव्हत्या, त्या ठिकाणी बैठकीच्या दिवशी पात्रता पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांचा विचार करणे हे न्याय्य आणि नियमसंगत असल्याचा मुद्दा शिक्षक संघटनांनी ठामपणे मांडला होता. सामान्य प्रशासन विभागाच्या पदोन्नती नियमांनुसार आणि शासनाच्या शिथिलता देण्याच्या अधिकारानुसार या संपूर्ण प्रकरणाचा पुनर्विचार होण्याची शक्यता आता वाढली आहे.

शिक्षकांचे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेवर तात्पुरता ब्रेक लागला असला तरी, ज्येष्ठ शिक्षकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता राज्य सरकार पुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com