Bomb Threat : विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी : मंत्रालय, मेट्रो आणि स्टॉक एक्सचेंजचाही उल्लेख! राज्यभरात सुरक्षा अलर्ट; तपासात मोठा खुलासा

Security Alert After Bomb Threat : मुंबईतील विधानभवन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि उच्च न्यायालयासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी तीन महिन्यांपूर्वीही देण्यात आली होती.
Maharashtra Vidhan Bhavan
Maharashtra Vidhan Bhavansarkarnama
Published on
Updated on

Vidhan Bhavan hoax bomb threat news : राज्यात पुन्हा एकदा बॉम्बने महत्त्वाच्या ठिकाणांना डवून देण्याची धमकी देणारा मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल विधान भवनाला आला असून यात विधान भवनाला बॉम्ब स्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. तसेच याच मेलमध्ये मेट्रो स्टेशन, मंत्रालय, स्टॉक एक्सचेंजचा देखील उल्लेख करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलीस यंत्रणांनी जलदगतीनं हालचाल करत विधान संपूर्ण विधिमंडळाची तपासणी केली. ज्यानंतर हा हॉक्स ई-मेल असल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान तीन महिन्यांच्या आधी देखील असाच एक मेल प्रशासनाला मिळाला होता. ज्यात मुंबईतील विधानभवन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि उच्च न्यायालयासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा शुक्रवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांनी धमकीचा मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.

धक्कादायक म्हणजे सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असतानाच असा धमकीचा मेल आल्याने पोलिस प्रशासनासाह प्रशासनात मोठी खळबळ उडाली. तर पोलिस प्रशासन अलर्टवर आले. पोलीस यंत्रणेकडून जलदगतीनं कडक एसओपींसोबतच विधिमंडळ परिसरातील कसून तपासणी करण्यात आली. केल्यानंतर हा हॉक्स ई-मेल असल्याचं स्पष्ट झालंय.

Maharashtra Vidhan Bhavan
Bomb Threat: मुंबई, पुण्याच्या महापौरांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल; महापालिकेची इमारत केली रिकामी; नागपूरमधील ठिकाणंही टार्गेटवर

दरम्यान आता सायबर गुन्हे आणि तपास यंत्रणा आता हा धमकीचा ईमेल कोणी आणि कोणत्या सर्व्हरवरून (आयपी ॲड्रेस) पाठवला, याचा तपास करत असून अद्याप याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र अशा खोट्या धमक्या वारंवार येत असल्याने सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com