Kunal Raut : युकाँचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांच्या अडचणी वाढणार? कार्यकर्त्याला धमकी व जातीवाचक शिवागाळ केल्याचा आरोप

Maharashtra Pradesh Youth Congress : आगामी स्थानिकच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी कमी होताना काही दिसत नाहीत. आता युकाँचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Pradesh Youth Congress Kunal Raut
Maharashtra Pradesh Youth Congress Kunal Rautsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : युवक काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना निलंबित करून वादग्रस्त निर्णय घेणारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी आणखी एक वाद ओढावून घेतला आहे. रोजंदारी कामगाराचे पैसे मागायला आलेल्या एका कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरूनच धमकी दिल्याच्या दावा तक्रारदाराने केला आहे. यामुळे पुन्हा एकदा युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणुकीची तयारी करीत असलेल्या राऊतांच्या समोरील आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रशांत प्रकाश गायकवाड याने ही तक्रार नोंदवली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुनसार ते कुणाल राऊत यांच्याकडे रोजंदारी कामगारांचे पैसे मागायला त्यांच्या घरी गेले होते. बाहेर उभे असताना गुजरात पासिंगच्या कारमधून अभिषेक वर्धन सिंग व त्याचे तीन ते चार साथीदाराने आपल्याला अडवले. सिंग हा राऊत यांच्या निकटवर्तीय मानला जातो. त्याने आपल्याला शिवीगाळ केली. नंतर गाडीत बसलेल्या एका युवकाने आपल्याला रिव्हॉल्वर दाखवत मोबाईल हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

तसेच मोबाईलवर गुगल लोकेशन टाकून त्या जागेवार थांबायला सांगितले. थोड्या वेळाने सीताबर्डी पोलिस ठाण्यातून आपल्याला फोन आला. कुणाल राऊत याने तुमच्या विरुद्ध तक्रार केली असून तत्काळ पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. अभिषेक सिंगने आपल्याला 'तुझे ऐसे झुठे केस मे फसाऊंगा की जेल मे सडा राहेगा' अशी धमकी दिल्याचेही प्रशांत याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Maharashtra Pradesh Youth Congress Kunal Raut
Congress BJP rally Maharashtra : आता महाराष्ट्रात 'यात्रायुद्ध'; काँग्रेसच्या 'जय हिंद'ला भाजप देणार 'तिरंगा यात्रे'ने प्रत्युत्तर

तसेच 'नागपूर पोलिस मेरेसे डरती है' असेही त्याने धमकावले. त्यामुळे आपण घाबरून तत्काळ गाडीने मुंबईला निघून गेलो. वाटेत असताना अभिषेक सिंगने अनेक फोन केले. 'तू कही भी रहे तुझे उठाके लेके आऊंगा, जल्दी वापस आ' अशा पुन्हा धमक्या त्याने दिल्या. त्यामुळे आपण आपल्या घराजवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील मोहपाडा पोलिस ठाण्यात अभिषेक सिंग व त्याच्या साथीदाराच्या विरोधात ॲट्रोसिटीची तक्रार नोंदवली असल्याचेही गायकवाड याने सांगितले आहे.

Maharashtra Pradesh Youth Congress Kunal Raut
Shivsena Vs Congress : कोल्हापुरात काँग्रेस फुटणार? बंटी पाटलांचे शिलेदार शिंदे सेनेच्या वाटेवर, पण......

तसेच त्याने माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण द्यावे अशी विनंतीही केली असून मोबाईल आलेल्या कॉलचे स्क्रिन शॉटही त्याने आपल्या तक्रारीसोबत जोडले आहे. कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरून या धमक्या देण्यात आल्याचा दावाही प्रशांत गायकवाड याने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com