

Rajya sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या 11 आमदारांना खेचण्यासाठी भाजपकडून गळ टाकण्यात आला आहे. याची खास जबाबदारी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. बावनकुळे यांची ओडिसासाठी पर्यवक्षेक म्हणून नियुक्ती झाली असून नुकतेच ते भुवनेश्वरला रवानाही झाले आहेत.
देशभरात राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारी (9 मार्च) यातील 26 जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचाही समावेश आहे. तर बिहार, हरियाणा आणि ओडिशा या 3 राज्यातील 11 जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 तारखेला मतदान होणार असून त्याचदिवशी निकालही जाहीर होणार आहे. यासाठी बुधवारी रात्री बावनकुळे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहोचले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल तसेच ओडिशा विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद सरोजकुमार प्रधान यांनी स्वागत केले.
ओडिशामध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवार मैदानात आहेत. विधानसभेतील संख्याबाळनुसार भाजपचे 2 आणि बिजू जनता दलाचा 1 आमदार सहज निवडून येऊ शकतो. यानंतर भाजपकडे 20 अतिरिक्त मते राहतात. बिजू जनता, काँग्रेस आणि इतर 3 अशी 34 मते अतिरिक्त असून या मतांच्या आधारे काँग्रेसने दत्तेश्वर मिक्ष यांना समर्थन दिले आहे.
पण त्याचवेळी भाजपने दिलीप रे यांच्या रुपाने पाचवा उमेदवार मैदानात उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे. चौथ्या जागेसाठी भाजप समर्थित दिलीप रे आणि काँग्रेस समर्थित दत्तेश्वर मिक्ष यांच्या लढत होणार आहे. भाजपला दिलीप रे यांच्या विजयासाठी आणखी 11 मतांची गरज आहे. यासाठी बिजू जनता दल आणि काँग्रेसची 11 मते भाजपला फोडावी लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.