Asaduddin Owaisi Video : 'मनोज जरांगेंचे नाव घेताना जीभ अडखळते', असदुद्दीन ओवैसींनी उडवली देवेंद्र फडणवीसांची खिल्ली

Maharastra Assembly Election asaduddin Owaisi Challenge Devendra Fadnavis : औवैसी म्हणाले, देवेंद्र फडणवीस वोट जिहाद बोलले. जेव्हा जेव्हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव होतो तेव्हा यांना वोट जिहाद आठवतो.
Asaduddin Owaisi | Devendra Fadnavis
Asaduddin Owaisi | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi News : 'एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत टीका करताना फडणवीस हे मनोज जरांगे यांचे नाव देखी घेऊ शकत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेताना त्यांची जीभ अडखळते, अशा शब्दांत खिल्ली उडवली.

असदुद्दीन ओवैसींनी म्हणाले, फडणवीस तुम्ही औवीसीचे नाव घेऊ शकता पण तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे नाव घेऊ शकत नाही. तुम्ही मनोज जरांगे पाटील असं बोलून दाखवा, असं चॅलेंजच औवैसींनी फडणवीसांना दिले.

Asaduddin Owaisi | Devendra Fadnavis
South Solapur Constituency : दिलीप मानेंसाठी आलेला काँग्रेसचा एबी फार्म कोणी रोखला...कोणाचा होता आदेश?

तुम्ही मनोज जरांगे पाटील बोलू शकत नाही. तुमची जीभ अडखळते. फडणवीस तु्म्ही आणि अमित शाह, नरेंद्र मोदी मिळून जरी बसला तरी माझ्या समोर टिकू शकत नाही. तुम्ही माझा सामना करू शकत नाही, असे औवैसी म्हणाले.

निवडणूक आयोगाने कारवाई करावे

औवैसी म्हणाले, देवेंद्र फडणवीस वोट जिहाद बोलले. जेव्हा जेव्हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव होतो तेव्हा यांना वोट जिहाद आठवतो. वोट जिहाद, धर्मयुद्ध असं प्रचारात बोलता हे योग्य आहे. लोकशाहीमध्ये असं बोलता येतं का? फडणवीस वोट जिहाद, धर्मयुद्ध बोलत आहेत.यावर निवडणूक आयोग गप्प का आहे? ते कारवाई का करत नाहीत? असा सवाल देखील औवैसी यांनी उपस्थित केला.

Asaduddin Owaisi | Devendra Fadnavis
Paithan Assembly Constituency : विकासकामांच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जातोय..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com