MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ऑनलाईन? राज्य परीक्षा परिषदेचे IBPS ला पत्र

MAHATET Online Exam: टीईटी पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या तयारीत असून IBPS ला अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता.
NEET UG 2026
NEET UG 2026Sarkarnama
Published on
Updated on

MAHATET Exam News: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन यााबाबत राज्य परीक्षा परिषदेने विचार विनिमय करीत आहेत अशातच टीईटी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर उमेदवारांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर भर दिला जात आहे. यामुळे परीक्षेची सुरक्षा, विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न करीत आहे.

परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘आयबीपीएस’ (IBPS) यांच्याशी संपर्क साधला आहे. परिषदेचे आयुक्त महेश चोधे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत पत्र पाठवून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत सहकार्याची विनंती केली आहे.

NEET UG 2026
High Court Order Farmers: न्यायालयाचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; प्रलंबित दावे सहा महिन्यांत निकाली काढणार

यापूर्वी २८ जून २०२६ रोजी टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. पेपर १ साठी २ लाख ५८ हजार ६१ आणि पेपर २ साठी ३ लाख ४२ हजार ६४ अशा एकूण ६ लाख ९२५ उमेदवारांनी अर्ज केले होते. राज्यभरातील १ हजार ७२९ केंद्रांवर परीक्षा होणार होती. मात्र काही कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी २०२८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची बनली आहे.

NEET UG 2026
MSRTC Action: ST प्रशासनाने उगारला शिस्तीचा बडगा! नाशिक विभागातील 11 अधिकारी निलंबित

परीक्षा परिषद भविष्यात वर्षातून किमान दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. यापुढील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयबीपीएसकडे जबाबदारी सोपवून परीक्षा प्रक्रियेला अधिक विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

NEET UG 2026
Siya Goyal Viral Video: केतनचा जीव घेतल्यानंतरही सियाची मुजोरी कायम? पोलीस कोठडीतून बाहेर येताच केले अश्लील हावभाव

परीक्षा आयोजनासाठी आवश्यक जिल्हानिहाय माहिती आणि आकडेवारी परीक्षा परिषदेने आयबीपीएसला उपलब्ध करून दिली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्त यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com