

Nashik News: राज्य परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासन नेहमीच गैरकामामुळे चर्चेत असते. याला छेद देणारी घटना नाशिकच्या प्रशासनात घडली. बेशिस्त आणि नियमबाह्य कामामुळे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्यासह तब्बल 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. परिवहन महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्याच्या तीव्र प्रतिक्रिया प्रशासनात उमटल्या आहेत.
नाशिक विभागाचे खालावलेले उत्पन्न कामकाजातील गंभीर त्रुटी आणि कामकाजातील नियमांचे उल्लंघन यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांनी यासंदर्भात विविध आकारांना भेटी देऊन पाहणी केली होती. त्यानंतर आढळलेल्या त्रुटी लक्षात घेऊन थेट वरिष्ठांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इगतपुरी आगाराला वरिष्ठांनी 10 जूनला भेट दिली होती. यावेळी अपघातग्रस्त बस 20 दिवस उभी असल्याचे आढळले होते. बस तातडीने दुरुस्त करून उपयोगात आणणे आवश्यक होते. पण तसे न घडल्याने दररोज वीस हजार रुपये नुकसान झाल्याचे आढळले. या आगारातून 'इशू अँड स्टार्ट'या उपक्रमाचे देखील पालन केले गेले नव्हते. बस सुटल्यानंतर विलंबाने त्याची नोंद झाल्याचे आढळले. स्वच्छतागृहासाठी प्रवाशांकडून दर आकारला जातो. मात्र त्या स्वच्छतागृहासह आगारातील कार्यालयाची दुरावस्था झाल्याचे आढळले.
पंचवटी आगारातही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, हंगाम असताना मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आल्या. या अवधीत अन्य कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागले. ओवर टाईम द्यावा लागल्याने त्यावर मोठा खर्च झाला.
विविध आगारांना भेटी दिल्यानंतर एसटीचे उत्पन्न कमी होईल, असे कामकाज आढळले. खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने खास ड्राईव्ह सुरू केला आहे. त्याचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे प्रशासनाने अंतर्गत शिस्त व कामकाजात सुधारणा होण्यासाठी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबनाचा निर्णय घेतला.
प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, इगतपुरी आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे, विभागीय अभियंता चैताली भुसारे, नाशिक विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, पंचवटी आगार व्यवस्थापक सौरभ देवरे, लेखा अधिकारी नीलिमा विसपुते आणि संजय गायधनी, भांडार अधिकारी अमोल वाघ, कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.