'मविआ'चा मोठा निर्णय : नंबर एकचा पक्ष ठरुनही भाजपला देणार दणका

Nagar Panchayat Election | BJP | Mahavikas Aaghadi : नगराध्यक्षपदासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार...
uddhav thackeray - ajit pawar
uddhav thackeray - ajit pawarsarkarnama

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या १०६ नगरपंचायत निवडणूक निकालात ३८४ जागा जिंकत भाजप (BJP) नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ३४४ जागा जिंकल्या. तर ३१६ जागांसह काँग्रेस (Congress) तिसऱ्या स्थानावर आणि २८४ जागांसह शिवसेना (Shivsena) थेट चौथ्या स्थानावर राहिली. मात्र आता महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी घेतलेल्या एका निर्णयाने सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप नगरपंचायतींमधील सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने आज परिपत्रक जारी करत निवडणूक पार पडलेल्या नगरपंचायतींमध्येही आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीने हे एकत्रित परिपत्रक जारी करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर प्रयत्न करुन, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे निवडून येतील याकरिता प्रयत्न करावेत, असे या परिपत्रकामध्ये सांगितले आहे.

uddhav thackeray - ajit pawar
काँग्रेसला केजरीवालांचा धसका? चन्नींसाठी घेतला मोठा निर्णय

काय म्हटले आहे महाविकास आघाडीच्या परिपत्रकात?

महाविकास आघाडी स्थापन होऊन २ वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या हिताच्या व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून आज सुयोग्यरित्या महाराष्ट्रातील जनतेला समान विकास कार्यक्रम अंतर्गत सक्षमरित्या कार्य करीत आहेत.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आज आपण सर्वजण पहिल्यांदाच १०६ नगरपंचायतीच्या व भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद तसेच १५ नगर पंचायत समित्या निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस यशजनतेने दिले. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार.

uddhav thackeray - ajit pawar
"दारु आणि दारुड्यांना शोधून काढा": शिक्षकांवर आता नवी जबाबदारी

नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश आपल्याला कायम ठेवायचे आहे व जनतेने दाखवलेला विश्वास हा पुन्हा त्यांना समान विकास कार्यक्रमानुसार विकास स्वरूपात पुन्हा द्यावयायचा असेल तर आपल्याला प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे देखील अत्यावश्यक आहे. तरी आपण सर्वांनी याकरिता स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे निवडून येतील याकरिता प्रयत्न करावेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com