Vidhan Sabha Election 2024 : महायुती अन् महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर, मात्र अद्यापही...

Mahavikas Aghadi News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 'सांगली पॅटर्न' राबवणार काय? या शंकेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाला घेरल्याचे दिसत आहे.
Mahavikas Aghadi, Mahayuti
Mahavikas Aghadi, MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election Seat Allocation: विधानसभा निवडणुकीसाठी कालपर्यंत महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र अद्यापही महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्या संपूर्ण जागांचा तिढा सुटलेला नाही.

महाविकास आघाडी 33 जागांचा घोळ अद्याप कायम असून, काँग्रेसला हव्या असलेल्या काही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे काहीशी नाराजी पसरली होती. अर्थात या नाराजीची दखल घेत प्रशासकीय चुका झाल्या असून त्या आम्ही लवकरच दुरुस्त करू असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घोषित केले आहे.

तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 'सांगली पॅटर्न' राबवणार काय? या शंकेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार (NCP) पक्षाला घेरल्याचे दिसत आहे.

जागावाटप जाहीर होण्यापूर्वी रामटेक, सांगोला, मध्य नाशिक, परांडा या जागांचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घोषित केल्याने ही शंका घेतली जाते आहे. मात्र काही प्रशासकीय त्रुटी असल्याचे कारण देत संजय राऊत यांनी सामोपचाराची भूमिका कायम दाखवली.

मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खंद्या कार्यकर्त्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांना लढवायचा विचार आहे. पण काँग्रेस या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही वर्सोवा या जागेचा वाद देखील अद्याप संपलेला नाही भायखळा, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी या जागांचेही कोणतेही निर्णय अद्याप लागलेले नाहीत.

शिवसेना (Shivsena) यातील वादग्रस्त जागांवर परस्पर उमेदवार घोषित करून सांगली पॅटर्नची सुरुवात केली असल्याचे काँग्रेस नेते खासगीत म्हणत आहेत खरे परंतु राहुल गांधी यांनी भाजपविरोधात एकत्र या अशी भूमिका घेतल्यामुळे त्या संदर्भात कोणतेही विधान करायला कोणीही पुढे आलेले नाही. जागा वाटपाचा घोळ अद्याप क्षमलेला नाही मुंबई परिसरातील काही जागांवर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात वाद सुरू आहेत.

Mahavikas Aghadi, Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election Live Update : काँग्रेसने जाहीर केली पहिली उमेदवारी यादी; जाणून घ्या, किती जणांचे नाव केले घोषित!

तसेच दर्यापूर, अमरावती आणि दक्षिण सोलापूर तसेच मध्य नाशिक या जागांवरच्या घोळामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत अस्वस्थता आहे. सांगोला ही पश्चिम महाराष्ट्रातील जागा 'शेकाप'ला द्यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची इच्छा असताना ती स्वतःकडे घेत दीपक साळुंखे या राष्ट्रवादीच्या नेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे.

तर अविनाश देशमुख यांच्यामागे राष्ट्रवादी आहे असे मानले जाते. उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परस्पर घोषित केल्यामुळे अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. मध्य नाशिक ही जागा काँग्रेसला हवी होती परंतु तेथे मनसेतून आलेल्या वसंत गीते यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

रामटेक या विदर्भातील जागेवर दोन्ही पक्षांनी प्रारंभापासून दावा केला होता ही जागा राजेंद्र मुळक या दमदार नेत्यासाठी काँग्रेसला (Congress) हवी आहे मात्र तेथे शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी घोषित केली.

तसेच परांड्याची जागा राहुल पाटील यांना शिवसेनेने दिली आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील हे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने हा निर्णय घेण्यात आला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेलेल्या राहुल मोटे यांनाही जागा हवी आहे. त्यामुळे या जागेचा घोळ अद्याप सरलेला नाही.

Mahavikas Aghadi, Mahayuti
Mahayuti News : महायुतीचा असा असणार मेगाप्लॅन; अमित शाह नेमकं काय म्हणाले...

दरम्यान जागा वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधला असता काही मतदारसंघात आम्ही समोरची आघाडी कोणता उमेदवार घोषित करते त्याकडे लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आम्ही काही जागां वरील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नसल्याचे सांगितले गेले.

मात्र 12 जागांवर अद्याप एकमत झाले नसल्याचेही मान्य करण्यात आले. तिन्ही पक्षांचा या जागांवर दावा आहे अर्थात हे मतभेद मनभेद नसल्यामुळे तिढा सोडवणे शक्य असल्याचेही नमूद करण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com