Ajit Pawar News : सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना प्रश्न अन् अजितदादांनी दिलं उत्तर...

Ajit Pawar Vs Supriya Sule : पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले होते. पण, दोघांनीही एकमेकांना बोलणं टाळलं.
devendra fadnavis ajit pawar supriya sule
devendra fadnavis ajit pawar supriya sulesarkarnama

अडीच वर्षे नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक न झाल्यानं जनतेनं कुणाकडे जावं? हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर देवेंद्र फडणवीस कोणतीही भाष्य केलं नाही. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी ताबडतोब उत्तर दिलं आहे. "सर्वोच्च न्यायालयामुळे नगरसेवकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

devendra fadnavis ajit pawar supriya sule
Sunil Shelke News : "मला खासदार अन् माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं नाही, तुमचं...", शेळकेंचा सुळेंना टोला

पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रूग्णालयाचं भूमिपूजन माळवाडी परिसरात आज ( 10 मार्च ) पार पडलं. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. मंचावर असूनही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांना बोलणं टाळलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी नगरसेवकांची भूमिका महत्वाची"

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या, "गेली दोन-अडीच वर्षे निवडणूक न झाल्यानं जनतेनं कुणाकडे जावं? हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, हे स्वप्न यशवंतराव चव्हाण यांचं होतं. सत्तेचं विकेंद्रीकरण होण्यासाठी नगरसेवकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी. यामुळे जनतेला आधार मिळेल."

devendra fadnavis ajit pawar supriya sule
Kolhapur Airport News : कोल्हापूर विमानतळावरून पाटील, महाडिक अन् संभाजीराजेंमध्ये श्रेयवादाचे 'उडान'

"निवडणुका लवकर व्हाव्यात हेच सरकारचं मत"

यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख न करता उत्तर दिलं. "दोन वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगपालिका, नगपंचायतीत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी ही आमची इच्छा आहे. पण, ओबीसी प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तसेच, निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात हेच सरकारचं मत आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी," असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.

devendra fadnavis ajit pawar supriya sule
Sujay Vikhe News : 'मैं हू डॉन' गाण्यावर सुजय विखेंचा डान्स; पण 'मी डॉन नाही, तर..' असंही बोलून दाखवलं!

"मी अन् चंद्रकांतदादांनी नगरसेवकांना निवडून आणलं"

"मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात अनेक नगरसेवकांना निवडणूक आणलं. म्हणजे दोन्ही दादांनी नगसेवकांना निवडून आणलं आहे. बाकी कुणी आलं नव्हतं. माळवडी परिसरातील नगरसेवकांनी रूग्णालयासाठी प्रयत्न केले. पण, ते कुणालाही जमलं नाही. दहा वर्षे झालं, सात वर्षे झालं रूग्णालयासाठी प्रयत्न केल्याचे बॅनर मी पाहिले. मात्र, हे काय खरं नाही... देवेंद्र फडणवीसांना रूग्णालयाची कल्पना सांगितली. त्यानंतर फडणवीसांनी 'मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालय उभे करू' असं म्हटलं. तसेच, रूग्णालयाची कल्पना चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर यांनाही आवडली. त्यातून चांगल्या प्रकारचं रूग्णालय उभे राहत आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

devendra fadnavis ajit pawar supriya sule
Eknath Shinde : रामदासभाई बोलले ती वस्तुस्थिती; मुख्यमंत्री शिंदेंनीही ओढली कदमांची री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com