Solapur Politics : लोकसभेआधीच उडाला विधानसभेचा खटका; सोलापुरात कोठे-देशमुख समर्थकांत हाणामारी

Kothe Vs Deshmukh : महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. गेली वर्षे ते दीड वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत आहेत.
Mahesh Kothe-Chetan Narote
Mahesh Kothe-Chetan NaroteSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : विकास कामांच्या श्रेयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमध्ये सोलापुरात हाणामारी झाली. दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते हे पोलिस ठाण्यात आणि कार्यक्रमस्थळी आमने सामने आल्याने आधीच तापलेले सोलापूरचे वातावरण आणखी गरम झाले हेाते.

महेश कोठे (Mahesh Kothe) हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. गेली वर्षे ते दीड वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत आहेत. भाजपचे (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांना आव्हान देण्याचा प्रयत्न कोठे यांच्याकडून हेाताना दिसत आहे. विधानसभेच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांमधील निवडणुकीची चुणूक काही महिने आधीच सोलापूरकरांना पहायला मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahesh Kothe-Chetan Narote
Devendra Fadnavis News : अजितदादा अन्‌ सुप्रियाताईंपासून लांब कोपऱ्यात जाऊन फडणवीस फोनवर कोणाशी बोलले?

सध्या लोकसभेचा आखाडा सुरू आहे. त्याची आचारसंहिता लागण्याआधीच सत्ताधारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनाचा धडका लावण्यात आला आहे. सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्‌घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली.

हाणामारीच्या घटनेनंतर भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते. त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात कोठे यांच्या मदतीला गेले होते.

Mahesh Kothe-Chetan Narote
Supriya Sule On Ajit Pawar : आधी बारामती अन् आता पुण्यातही अजितदादांशी 'अबोला' का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

विधानसभेला विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून आमदार होण्याचा चंग कोठे यांनी बांधला आहे. पूर्व भागात कोठे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे तुल्यबळ लढतीची शक्यता आहे. त्याची चुणूक सोलापूरकरांना निवडणुकीच्या आधीच सहा ते सात महिने अगोदरच अनुभवायला मिळाली.

याबाबत शरद पवार गटाचे सोलापूरमधील नेते महेश कोठे म्हणाले, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून मी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याने भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे. विकास कामांना आमचा विरोध नाही. मात्र, भाजपचे आजपर्यंत पाच खासदार झाले. गेल्या वीस वर्षांपासून विजयकुमार देशमुख हे आमदार आहेत. विडी घरकुल परिसराला त्यांनी किती निधी दिला? विडी घरकुल त्यांना आताच दिसले काय? भाजपकडून विडी घरकुल भागातील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे.

Mahesh Kothe-Chetan Narote
VSI Meeting : अजितदादा, वळसे पाटलांनी शरद पवारांसोबत एकत्र येणे टाळले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com