MahaYuti seat sharing: विधानपरिषदेच्या 16 जागांवर फायनल डील, पण 'ती' एक जागा ठरली प्रतिष्ठेची; महायुतीच्या जागावाटपात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट

MLC Election News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणूक होत असून त्यासाठी महायुतीमधील मित्रपक्षात गेल्या आठ दिवसापासून जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे.
Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
Mahayuti MLC Election 2026 Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणूक होत असून त्यासाठी महायुतीमधील मित्रपक्षात गेल्या आठ दिवसापासून जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. राज्यात जागावाटपाबाबत तोडगा न निघाल्याने सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोन दिवस दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दरबारी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर आता तीनही पक्षात 17 पैकी 16 जागावर एकमत झाले आहे. महायुतीच्या जागावाटपाचे घोडे छत्रपती संभाजीनगर-जालना या एका जागेवरून अडले आहे. त्या जागेसाठी भाजप व शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. या जागेचा तिढा सुटल्यानंतर महायुतीच्या फायनल जागावाटपाची अधिकृत घोषणा होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना जागेचा तिढा सुटताच जागावाटप जाहीर होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या तीन नेत्याच्या बैठकीत 16 जागेचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजप (BJP) 10 एकनाथ शिंदे यांची शिवसेना 4 राष्ट्रवादी काँग्रेस 2 असा फॉर्म्युला फायनल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना जागेवरून भाजप व शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
MLC Election : भाजपचे दबावाचे राजकारण, नाशिक किंवा संभाजीनगर ; एकनाथ शिंदेंना एका जागेवर ओतावे लागेल पाणी?

दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दरबारी सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक झाली. त्याठिकाणी विधान परिषदेच्या जागावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस यांनी जागावाटपाची अंतिम बोलणी मुंबईत होणार असल्याचे सांगितले होते. आमचे जागावाटप जवळपास ठरले आहे. फक्त नाशिक आणि संभाजीनगर पैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे यावरून शिवसेनेसोबत बोलणं सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पुण्याची जागा मागितली आहे. या दोनच गोष्टींवर आमचे अडला असून काही कठीण राहिलेले नाही. कठीण पेपर संपला असून आता टिक मार्क बाकी आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
MLC Election : भाजपचे दबावाचे राजकारण, नाशिक किंवा संभाजीनगर ; एकनाथ शिंदेंना एका जागेवर ओतावे लागेल पाणी?

त्यानुसार शुक्रवारी महायुतीमधील तीन पक्षात जागावाटपाबाबत एकमत झाले आहे. पुण्याची जागा भाजपने राष्ट्रवादीला सोडली आहे तर नाशिकची जागा भाजपने शिंदे शिवसेनेला सोडली. त्यामुळे या जागेवरील तिढा सुटला आहे. त्यानुसार आता भाजप 10, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढणार आहे, हा फॉर्म्युला फायनल झाला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना जागेवर भाजप व शिंदेंची शिवसेना अडून बसली आहे. या जागेचा तिढा सुटल्यानंतर महायुतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
MLC Election : नेत्यांची धाकधूक वाढली! विधान परिषदेच्या जागांची शिवसेना, भाजपमध्ये अदलाबदली? 'या' मतदारसंघांत रात्रीतून खेळ बदलणार!

महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा :

भाजप : नागपूर ,चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, जळगाव, नांदेड, सोलापूर, सांगली-सातारा, धाराशिव-बीड-लातूर.

एकनाथ शिंदे शिवसेना : ठाणे-पालघर, नाशिक, परभणी-हिंगोली, यवतमाळ,

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस : पुणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
MLC Election : भाजपचे दबावाचे राजकारण, नाशिक किंवा संभाजीनगर ; एकनाथ शिंदेंना एका जागेवर ओतावे लागेल पाणी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com