MLC Election : भाजपचे दबावाचे राजकारण, नाशिक किंवा संभाजीनगर ; एकनाथ शिंदेंना एका जागेवर ओतावे लागेल पाणी?

Devendra Fadnavis Strategy, Nashik and Sambhajinagar Seats नाशिक किंवा संभाजीनगर यापैकी एक जागा आम्हाला हवी आहे असा आग्रहच भाजपने केल्याने शिवसेनेवर दबाव वाढला आहे. भाजप आपल्या भूमीकेवर ठाम राहिल्यास शिवसेना काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.
Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु होऊन तीन दिवस उलटले आहे. मात्र, महायुतीमधील जागावाटपाचे घोंगडे आजूनही भिजतच आहे. शिवसेना व भाजपमध्ये नाशिक व संभाजीनगर या दोन जागांवरुन गाडी अडल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांपैकी किमान एक जागा भाजपला हवी आहे. मात्र, शिवसेनेसाठी या दोन्ही जागा महत्वाच्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नसून हा वाद थेट भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकुण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेचाही समावेश आहे. सोमवार (दि. 25)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महायुतीत जागावाटपाचा पेच अद्याप सुटत नसल्याचे चित्र आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
Nashik MLC Election : नाशिकच्या जागेवरुन आधीच शिवसेना-भाजपमध्ये ओढाताण, त्यात आता हळूच राष्ट्रवादीची एण्ट्री

महायुतीत सुरुवातीला भाजपने स्वत: कडे १२ जागा, शिवसेनेकडे ३ जागा व राष्ट्रवादीकडे २ जागा असा फॉर्म्युला ठरवला होता. मात्र, शिवसेनेने पाच ते सात जागांची मागणी केली होती. आता राष्ट्रवादीकडूनही ३ जागांची मागणी केली जात असून भाजपसोबत चर्चा सुरु आहे. परंतु भाजप 12 जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती असून शिंदेंच्या शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एकुण 17 पैकी 14 जागांच्या जागावाटपाचा पेच सुटल्यात जमा असून नाशिकसह छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या तीन जागांचा तिढा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी (दि. 26) रात्री झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीतही या जागांवरील तोडगा निघालेला नाही.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
MLC Election : विधान परिषदेची गाडी हुकली, एकनाथ शिंदेंच्या पक्षातील 'फायर ब्रँड' महिला नेत्या नाराज, म्हणाल्या, 'साहेब...'

नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर हवे

भाजपने सर्वांधिक संख्याबळाचा दाखला देत नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे. तर, गेल्यावेळी शिवसेनेचा आमदार असल्याने शिवसेनाही नाशिकवरचा दावा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपने नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर पैकी एका जागेची मागणी केली आहे. "शिवसेनेसोबत नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर यांपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. तर पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडून मागितली आहे. या दोनच गोष्टींवर आमचे अडले आहे, जे आम्ही सोडवून घेऊ," असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद निवडणुकांवर भाष्य केलं आहे.

त्यामुळे भाजप आपल्या भूमिकेवर कायम राहिल्यास एकनाथ शिंदे यांना नाशिक किंवा छत्रपती संभांजीनगर यापैकी एका जागेवर पाणी सोडावे लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून एकप्रकारे शिंदेंवर दबाव टाकला जात असल्याचे दिसत आहे. संभाजीनगर आणि जालना महापालिका, संभाजीनगर जिल्हा परिषद यामध्ये भाजप वनसाईड जिंकला आहे. त्यामुळे भाजपकडून छत्रपती संभाजीनगर घेतलं जाऊ शकतं. शिवसेना नाशिक आपल्याकडे ठेऊ शकते अशी शक्यता आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com