Mahayuti Government: मंत्रिमंडळात उलथापालथ,शिवसेनेच्या मंत्र्याला डच्चू? शिंदेंच्या कट्टर समर्थकाला लवकरच 'लाल दिवा'? बड्या नेत्याचे संकेत

Shivsena Minister News: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे. अशातच शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे लवकरच मंत्र्याला डच्चू देणार असल्याची चर्चा आहे.
Eknath-shinde
Eknath-shindeSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे. अशातच शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे लवकरच मंत्रिमंडळातून त्यांच्या पक्षाच्या निष्क्रिय मंत्र्‍यांना डच्चू देणार असल्याची चर्चा आहे.लवकरच नव्या आमदाराचं मंत्रिमंडळात वर्णी लागण्यात येणार असल्याचे संकेत खुद्द खासदार श्रीकांत शिंदेंनीच दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र व शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविषयी मोठे संकेत दिले आहेत. संतोष बांगर हे केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असणारे कार्यकर्ते नसून ते एक धडाडीचे नेते आहेत, त्यामुळे येत्या काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल,असं सूचक वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या संकेतानंतर मराठवाड्यासह राज्याच्या राजकारणातही शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीची जोरदार चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. आजवर बांगर यांनीही कधीच स्वत: मंत्रि‍पदाविषयीच्या अपेक्षा लपून ठेवलेल्या नाहीत.

हिंगोली येथे गुरुवारी(ता.28)खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना सभा झाली.या सभेत एकनाथ शिंदेंचे लाडके आमदार संतोष बांगर यांच्या मंत्रिपदाची मागणी करण्यात आली. सभेतच श्रीकांत शिंदेंसमोर बांगर यांच्या समर्थकांनी बांगर यांच्या 'लालदिव्या'ची मागणी लावून धरली.

Eknath-shinde
Ram Shinde On Prajakt Tanpure : अहिल्यानगरमध्ये तनपुरेंच्या उमेदवारीची चर्चा : राम शिंदे म्हणाले, ‘निवडणुका जिंकण्यासाठी निष्ठावंत अन्‌...’

तसेच आमदार संतोष बांगर यांनीही या सभेत स्वत:च्या शिवसेना पक्षालाच घरचा आहेर दिला. त्यांनी आपल्या रोखठोक भाषणात शिवसेनेचे अनेक मंत्री म्हातारे झाले आहेत. त्यांना बाजुला करुन आमच्यासारख्या वाघांना पुढे आणा. नव्या दमाच्या नेत्यांना पुढे आणून मंत्रिपद देण्याचं आवाहन पक्षनेतृत्त्वाला केलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत जेणेकरुन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील,असा आक्रमक पावित्रा बोलून दाखवला.

शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपद देण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतात. मात्र, हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी किंवा मंत्रिपदाची संधी दिली जाण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत

Eknath-shinde
MahaYuti seat sharing: विधानपरिषदेच्या 16 जागांवर फायनल डील, पण 'ती' एक जागा ठरली प्रतिष्ठेची; महायुतीच्या जागावाटपात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट

संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. हे मंत्री सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत. फोन उचलत नाहीत, अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली. अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत. फोन केला तर फोनचा रिप्लाय सुद्धा देत नाहीत. ते मंत्री पक्षाला कमजोर करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

संतोष बांगर म्हणाले, पक्षातील काही मंत्री नुसते लोकांमध्ये जातात, परंतु काही काम करत नाहीत. पण याचवेळी त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचं कौतुकही केलं. ते म्हणाले, आबिटकरांना कधीही फोन केला तर ते उचलतात, समस्या ऐकून घेतात. मात्र,अनेक मंत्री म्हातारे झाले आहेत, त्यांना ऐकू येत नाही. त्यांना पदावरुन बाजूला करा. या शेळ्यांमागे वाघ दडले असल्याचा दावाही बांगरांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com