Ram Shinde On Prajakt Tanpure : अहिल्यानगरमध्ये तनपुरेंच्या उमेदवारीची चर्चा : राम शिंदे म्हणाले, ‘निवडणुका जिंकण्यासाठी निष्ठावंत अन्‌...’

Vidhan Parishad Election 2026 : अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारी चर्चेदरम्यान राम शिंदे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली आहे.
Prajakt Tanpure-Ram Shinde
Prajakt Tanpure-Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 May : अहिल्यानगर विधान परिषदेची जागा ही भाजपकडे आली आहे, त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. त्याबाबत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी निष्ठावंतांची आठवण करून दिली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी निष्ठावंतांची मदत घेतलेली असते, त्यामुळे त्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे, असे सांगून शिंदे यांनी तनपुरेंच्या उमेदवारीबाबत अप्रत्यक्षपणे नापसंती व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये धनगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्‌घाटन केल्यानंतर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी धनगरी ढोल वाजवला. शिंदे यांच्या हस्ते सोलापुरात अहिल्यादेवींच्या 51 पुतळ्यांचे वाटप आणि 31 मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भाष्य केले.

प्रा. राम शिंदे म्हणाले, माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचा भाजपत प्रवेश होणार आहे. अहिल्यानगरची विधान परिषदेची जागा भाजपकडे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच अहिल्यानगर भाजपची कोअर कमिटीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आज होत आहे, त्या बैठकीत निर्णय होईल.

Prajakt Tanpure-Ram Shinde
Karad Politic's : भोसले-उंडाळकर युतीचा बाळासाहेब पाटील, पृथ्वीराजबाबांना धसका!

निवडणुकीत जिंकण्यासाठी निष्ठावंतांची मदत घेतलेली असते, त्यामुळे त्यांना न्याय देण्याची गरज असते. निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कधीही मागेपुढे पाहत नाही, असेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

राम शिंदे म्हणाले, सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या काम रखडले आहे. मात्र, त्याला निधी कमी पडणार नाही. स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता मार्गी लागलेले आहे, पुढील कामही लवकरच पूर्ण होईल.

Prajakt Tanpure-Ram Shinde
Karnataka CM news : शिवकुमारांच्या समर्थक आमदारांचा दावा ठरला खरा! सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच काँग्रेसमधील बड्या नेत्याकडून गौप्यस्फोट

सोलापूरमध्ये झालेल्या वृक्षतोडीबाबत राम शिंदे म्हणाले, सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. बेकायदेशीर वृक्षतोड झाली असेल तर प्रशासनाने त्यावर वेळीच दखल घेतली असेल. शेवटी इको सिस्टीम आणि इन्व्हायरोमेंटल बॅलन्स, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हा सर्व गोष्टीवर होत आहे, त्यामुळे बेकायदेशीर काम झालं असेल तर प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com