Local Body Election: वॉर्डातील सगळ्या मोक्याच्या जागांवर लग्गीच ‘फ्लेक्स’ लावायला पायजे!

...तर मंडळी, अखेर महापालिका, नगरपालिका निवडणुका होणार हे नक्की झालंय. या निवडणुकांसाठी आमचे कार्यसम्राट इच्छुक नगरसेवक खूपच उतावीळ झालेत. निवडणुका होणार म्हणून त्यांनी आधीच ते खूप खर्च करून बसलेत. परंतु 'जनसेवे'चं व्रत त्यांनी घेतलं असल्यानं त्यांनी पुन्हा लगबग सुरू झाली. त्यापैकी एका नगरसेवकपदासाठी इच्छुकाचं हे प्रातिनिधिक मनोगत...
Local Body Election:
Local Body Election: Sarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

कार्यसम्राट मा. नगरसेवक तात्या

ऊर्फ टोच्या परमार दादा :

(मणातल्या मणात... )

देवा पांडुरंगा...इलेक्शन लाग्ली म्हनायची. गेली पाच वर्षे वाट बगतुया. अख्खी ‘टर्म’ वाया गेली. पिरोबा, बिरोबा, म्हसोबा, मुंजोबा सगळ्या सगळ्यांन्ला नवसवाण करून झालं व्हतं. पन त्यांचा कौलच नाय मिळाला! यंदा प्रसन्न झालंत म्हनायचं. इलेक्शन आज लागंन उद्या लागंन म्हून लै आस लावून बस्लो होतो. पान्यासारखा लै पैसा खर्च केला. पन मायबाप न्यायालयाला काय आमची दया येईना. आता चार म्हैन्यांच्या आतच निवडनूक लागंल. लै कामं करायचीत. निवडनूक आज लागंन उद्या लागंन या आशेनं आधीच पैसा खर्च करून झालाय. आता कुनाला तरी पाल्थं घालावं लागतंय. रात्र थोडी नि सोंगं फार हायेत.

वॉर्डातील सगळ्या मोक्याच्या जागांवर लग्गीच ‘फ्लेक्स’ लावायला पायजे. त्यासाठी आधी चांगले भारी दोन-चार मोठ्ठे फोटो काढून घेतो. आधीचे ‘फ्लेक्स’वरचे आपले फोटो पाहून म्हणे गल्लीतल्या दोन पोरांची घाबरून दातखीळ बसल्याचं गाऱ्हानं घेऊन त्यांच्या आया आल्या होत्या. आता ‘फेशियल’ वगैरे चेहऱ्याची चांगली डागडुजी करून फोटो काढून ‘फ्लेक्स’वर लावतो बगाच.

Local Body Election:
Marathi Language: अभिजात दर्जा मिळाला पण, मायभूमीतच मराठी ठरतेय अडचणीची? दहावीत 38 हजार विद्यार्थी नापास

मागच्या वेळी इलेक्शन लागंन या आशेवर पैशाचा नुस्ता धूर केला व्हता. मोफत आरोग्य-नेत्र तपासणी शिबिर, सवलतीच्या टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन विक्री उपक्रम, ज्येष्ठांना चारधाम यात्रा, अष्टविनायक दर्शन, दिवाळी पहाट मैफल, डान्स कॉम्पिटिशन, भांडीवाटप उपक्रम, दिवाळीचा-ईदचा सरंजाम वाटप, फुकट पिक्चर दाखवणे...असा लै पान्यासारखा पैसा खर्च केला. पार धाप लागायची वेळ आली पन इलेक्शन काय लागायचं नाव घेईना. आया-बाया चार-चार वेळा भांडी बदलून घेऊन गेल्या. चार ज्येष्ठांनी(फुकट) चारधाम यात्रेत गैरसोय झाल्यानं हक्कानं झापलं. जनशेवेसाठी (त्यासाठी नगरसेवकपद पायजेलच) सगळं सगळं सहन केलं. पन निवडणूक काही होईना. असं कुटं अस्तं का?

वॉर्डात सुश्क्षित-सुस्स्कृंत (याचा उच्चार येक जमतच नाय राव) रहिवाशी असल्यानं अगदी सोत्ता लिहिलेल्या कवितांचा वाचन प्रोग्रामही आयोजित केला व्हता. त्याला तर लै रिस्पॉन्स मिळाला. वॉर्डात येवढे जेण्ट्स अन् लेडिज कवी-कव्यत्री असतील असं वाटलं नव्हतं. त्या पोग्रामला स्टेजवरच कवी-कव्यत्रींची येवडी गर्दी झाली, की पार स्टेज पडायची पाळी आली. खाली नाय म्हनायला मोजके श्रोते होते.

बहुतेक स्टेजवरच्यांचे नातलगंच होते. त्यांच्या कविता तीन तास (न झोपता) आयकण्याची शिक्षाही सहन केली राव. काही कव्यत्रींनी कविता गाऊन दाखविल्यानंतर दोन दिवस झोप आली नव्हती. सारखा दचकून उठायचो. पन शेवटी समाजशेवेसाठी (कार्पोरेटरपदासाठी हो) तेवढी कळ काढली. या सगळ्या काव्यरशिक अन्‌ कविता करनाऱ्या कवड्यांची मतं तर मिळतीन.

Local Body Election:
Operation Sindoor:सैन्यांची ताकद आणखी वाढणार; मोदी पुरवणार मोठी 'रसद'; हिवाळी अधिवेशनात मिळणार मंजुरी

‘लोकसभा’ झाली, ‘विधानसभा’ झाली. सगळीकडे राबलोय. आता खासदार-आमदार सायबांनी लक्ष द्यायलाय पायजेलाय आपल्याकडं. तिकीट मिळायलाच पायजेलाय. वार्डातील भावड्या, बबड्या, चिंत्या सगळ्या इच्छुक नगरसेवकांना पैशे चारून ‘करेक्ट कार्यक्रम’ करू. आवाज नाय पायजेलाय कुनाचा...

‘करेक्ट कार्यक्रम’ करू म्हनतोय खरा. पन असा सगळा धूर करायला पैसे पायजेलाय. हप्ते वाढवावे लागतीन. कंत्राटदारान्कडून पैसा उचलावा लागंन. जुगार, मटका गाड्या, बारकडं जरा लक्ष देऊन पैसा उचलावा लागनंच. आपल्या ‘कम्यनिटी’तल्या भाई लोकांनकडून पैसा उचलावा लागंन.

वार्डातील हॉटेलवाले, व्यापारी लोक, दुकानदार लोकांनकडून ‘देणगी’ उचलावी लागंन. कार्यकर्त्यांच्या बँक खात्यातून पैसा फिरवून उचलावा लागंन. हे जमलं नाय तर मग गळ्यातील येकेक किलोच्या दोन सोन्याच्या चेनी गहाण टाकू. हाय काय अन् नाय काय...

या कार्यकर्ते पोरं, पंटर लोकान्च्या खान्या-पिन्यावर पैसा ओतावा लागंन. लई बिलं करतात ही पोरं. काय म्हनायला गेलं की लगेच समोरच्या पार्टीत जातात. काय निष्ठा-बिष्ठा उरलीच नाय. निष्ठेची लागलीच विष्ठा करत्यात ही पोरं. आम्ही बगा आमचा नेता मरेपर्यंत निष्ठा सोडली नाय. कुनीतरी त्याचा ‘गेम’ केला. मगच आपन पुढं आलो. (‘गेम’ मीच केला, असं काय बाय नालायक लोक बोलत असत्यात. लक्ष नाय द्यायचं गड्या)

जुन्या केसेस डोकं वर काडणार नाय याची काळजी घ्यावी लागंन. पोलिसांना म्यानेज करावंच लागंन,

देवा, येवढा खर्च केल्यासरशी जरा वसुली बी होऊ दे. फार नाय तेवढं ‘स्थायी’चं सभापतिपदाच ‘लॉटरी’ लागली तरी लई झालं. मेयर बियर नाय व्हायचं आपल्याला बरं का. ‘ स्थायी’च्या ‘एसयूव्ही’वर मस्त सभापतिपदाची मेटलची पाटी लावून फिरू. होऊ द्या खर्च, वसुली तर होईलच की मगर त्याआधी आपल्या संजीवनी चमत्कारी-जलद साक्षात्कारी शंखबाबांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेऊन यावं लागंन. जय शंखबाबा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com