
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळेच शिवतीर्थावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या मेळाव्यात त्यांनी पक्ष फुटीवर भाष्य करताना अनेक जणांचे आपली शिवसेना फोडण्याचे लक्ष आहे, त्यांनी काही जणांना पळवलं ते पितळं होतं, पण सोनं माझ्याकडे आहे. त्यासोबतच पुन्हा एकदा हिंदुत्वाची लाइन घेत संघ, भाजप, पीएम नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत टीका केली. त्यामुळेच भाजपविरोधातील भूमिका घेताना त्यांनी हार्ड हिंदुत्व, मराठीचा गजर, व्यापाऱ्यांच्या हाती मुंबई जाऊ देणार नाही, असे सांगत स्थानिकच्या निवडणुकीतील रणनीतीचे संकेत दिले. त्यासोबतच येत्या काळात राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करणार असल्याचे स्पष्ट करीत भर पावसात भिजत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकात नवचैतन्य पसरवले.
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा मेळावा होणार की नाही याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, शिवतीर्थावर झालेल्या चिखलात व पावसात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 40 मिनिटांच्या ओघवत्या भाषणातून विरोधकांवर टीका करीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची धार कायम ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भर पावसात भिजत त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. पावसाची पर्वा न करता, भिजत उभे राहिलेल्या शिवसैनिकांचा जोश पाहून उद्धव ठाकरेही अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना नव्या संघर्षाची ऊर्जा दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामुळे एकीकडे या मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट केली.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, किती वेळा मी बोलायचे ही अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोन आयुष्य आहे. अनेक जणांचे आपल्या शिवसेना फोडण्याचे लक्ष आहे, त्यांनी काही जणांना पळवलं ते पितळं होतं, पण सोनं माझ्याकडे आहे. वाघाचं कातडं पांघरलेले कोल्हाची गोष्ट आपण ऐकली असेल, पण गाढवाने वाघाची चादर ओढलेलं मी पहिल्यांदा पाहिला. ते अमित शाह यांचे जोडे उचालणारे आहे, त्यांच्यावर किती आणि काय बोलायचं. हा मेळावा तसाचा घेतला जसा आजपर्यंत होत आहे. हा मेळावा चिखलात घ्यावा लागला. पण कमळाबाईच्या कारभारामुळे झाला आहे. कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचं वाटोळं केले आहे, अशी टीका करीत त्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट केली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, घरं दारं वाहून गेली. शेतकरी आज विचारतोय काय खायाचं, अशी परिस्थिती आज आली नाही. मराठवाड्यात आपत्तीग्रस्त आहे. संकट खूप मोठं आहे, लातूरला भूकंप झाला होता, तेव्हा आपण गावं दत्तक घेतली होती. आता आपल्याकडे सरकार नाही. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी लागणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना सरकारकडून मदत केली जात नाही तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणुका असल्याने त्या ठिकाणच्या जनतेला पॅकेज देत आहेत तर दुसरीकडे पुरग्रस्ताना मदत दिली जात नसल्याबद्दल टीका केली. त्यांच्या टीकेचा रोख भाजप (BJP), पंतप्रधान मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता.
त्याचवेळी भाजप हा अमिबासारखा असल्याचे सांगत त्यांनी कारभारावर सडकवून टीका केली. संघाने लावलेल्या झाडाला विषारी फळे आली आहेत. पण मला भागवत यांना विचारायचं आहे. मुंबई पालिकेची निवडणूक तुम्ही लावाच. मुंबईच्या रस्त्याची चाळण झााली आहे. जरा कुठे पाऊस झाला तर मुंबई तुंबत आहे. मोनो रेल लटकत आहे, लोक खड्यात जात आहे. बोटी का सुरू करत नाही. ही लोक भाजपचाचा महापौर झाला पाहिजे, असं सांगत आहे. ही लोक आता हिंदू -मुसलमान वाद पेटवत आहेत. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, माणूसकी हाच माझा धर्म असल्याचे सांगत त्यांनी संघाने लावलेल्या झाडाला विषारी फळे आली असल्याची बोचरी टीका यावेळी केली.
2024 च्या निवडणुकीत ठाकरे यांनी हिंदुत्वाची सौम्य लाइन धरल्याने त्यांचे नुकसान झाले होते हे ओळखून त्यांनी आता हार्ड हिंदुत्व हाती घेतले आहे. त्याचवेळी देशावर प्रेम करणारा कोणत्याही धर्माचा असू द्यात तो आमच्याच पक्षाचा म्हणत त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या नवीन व्होट बँकेवर फुंकर घातली आहे. त्यामुळे हिंदुत्वाची व्होट बँक पुन्हा जवळ करण्याची त्यांची रणनीती असू शकते.
मुंबईचा महापौर मुस्लिम होईल या भाजपकडून होत असलेल्या टीकेला ही त्यांनी यावेळी चोख प्रत्यत्तर दिले आहे. त्यांनी मुंबई व्यापाऱ्याच्या हाती जाऊ देणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. मुंबईत 12 ते 15 टक्के असलेले मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपलेपण बाळगून आहेत. असे ठरवून उद्धव ठाकरे हे हिंदुत्वविरोधी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजासोबत घेतलेल्या जेवणावर बोट ठेवले आहे. त्यासोबतच भाजपने त्यांच्या ध्वजातील हिरवा रंग काढून टाकावे असे आव्हान दिले.
त्यासोबतच यावेळी अपेक्षेप्रमाणे ते मनसे व शिवसेनेच्या युतीबाबत बोलले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, अरे मग ५ जुलैला काय केले होते, आम्ही एकत्र आलो आहेत, एकत्र राण्यासाठी जिथे मातृभाषेचा घात होईल तिथे फूट पडू देणार नाही, असे सांगत त्यांनी मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीचे संकेत दिले आहेत. या दोन पक्षांत जागाचे वाटप झाल्यानंतर युतीची घोषणा होईल, असे संकेत त्यांनी दिले.
नेहमीच्या भाषणात एकनाथ शिंदे यांना टार्गेट करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी यावेळी सीएम फडणवीस यांना लक्ष्य केले. देशातील लोकप्रिय सीएम कोण आहे, आपले सरकार होते तेव्हा महाराष्ट्रातील 5 मध्ये आपले सीएम होते. पण हे माझं कर्तृव्य नव्हते ते तुमचे होते. आता फडणवीस हे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दहाव्या क्रमांकावर आले आहेत. ते येणारच होते, कामाची बजबजपुरी करून टाकली असल्याची टीका करीत त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत त्यांचे टीकेचे लक्ष्य हे देवेंद्र फडणवीस असणार हे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.