Mahayuti tussle : 'एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानेच भाजप....'; शिवसेनेच्या आमदाराने डिवचले

Chandrakant Raghuvanshi News: नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महायुती सरकार हे तीन पक्षांचे मिळून बनलेले सरकार आहे आणि तिन्ही पक्ष या सरकारमध्ये दावेदार आहेत.
Devendra Fadnavis Eknath Shinde political dispute
Eknath Shinde gets setback from Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nandurbar News : राज्यातील राजकारण तापलेले असतानाच पुढची महिन्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षातच जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यातूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात असल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराने खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत टीका केली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महायुती सरकार हे तीन पक्षांचे मिळून बनलेले सरकार आहे आणि तिन्ही पक्ष या सरकारमध्ये दावेदार आहेत. पण भाजपला एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनीच संजीवनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात भाजप कुठे सत्तेत होती? एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणूनच भाजप आज राज्यात सत्तेत आली असल्याचे टीका त्यांनी केली.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर टीका करतानाच त्यांना आरसा दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणून भाजप सत्तेत आला आहे. भाजपला जिवंतच एकनाथ शिंदे यांनी केले आहे. नाहीतर भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिला नसता. महाविकास आघाडीच्या काळात भाजप सत्तेत कुठे होता? असा सवाल करीत एकनाथ शिंदे यांच्यामुळेच उठाव केल्यानंतरच भाजप (BJP) सत्तेत आला, असा दावाही रघुवंशी यांनी केला आहे.

त्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना चंद्रकांत रघुवंशी यांनी विजयकुमार गावितांवरही टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांची लॉटरी लागली. त्यांच्या मुळेच गावित अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री राहिले आहेत, असे म्हणत रघुवंशी यांनी गावितांवर निशाणा साधला. भाजपच्या सत्तेपासून ते गावितांच्या मंत्रि‍पदापर्यंत चंद्रकांत रघुवंशींच्या या वक्तव्याने नंदुरबारच्या राजकारणात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. रघुवंशींच्या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com