VIDEO : वाघ यांच्यावरून प्रसाद लाड अन् मेहबूब शेख भिडले; तंगडी तोडायची धमकी अन्...

Prasad Lad Vs Mahebub Shaikh : प्रसाद लाड यांनी शेख यांची तंगडी तोडायची भाषा केली होती. त्यामुळे आमदार लाड आणि शेख यांच्या वाद वाढण्याची शक्यता आहे.
Mahebub Shaikh | chitra wagh | prasad lad
Mahebub Shaikh | chitra wagh | prasad ladsarkarnama
Published on
Updated on

भाजप नेत्या, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्यावर टीका केली होती. यावरून भाजप आमदार, प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यात एकमेकांचा एकेरी उल्लेख करत जुंपली आहे. लाड यांनी शेख यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. तर, लाड यांच्या निवास्थानाबाहेर येतो, असं आव्हान शेख यांनी दिलं आहे.

चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी शरद पवारसाहेब यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यावरून मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला होता. यानंतर प्रसाद लाड यांनी शेख यांची तंगडी तोडायची भाषा केली. त्यामुळे आमदार लाड आणि शेख यांच्या वाद वाढण्याची शक्यता आहे.

Mahebub Shaikh | chitra wagh | prasad lad
Chitra Wagh : महाविकास आघाडीच्या नेत्यांना सिब्बल चालतात मग निकम का नको ? चित्रा वाघ यांनी सगळंच काढलं

प्रसाद लाड काय म्हणाले?

"शरद पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) राज्याला संस्कृतीचं राजकारण शिकवलं. सुप्रियाताई म्हणतात, 'राज्यातील महिला माझ्या भगिनी आहेत.' मात्र, ज्या सुप्रियाताईंना चित्रा वाघ यांनी हाताच्या बोटाला धरून महाराष्ट्रभर फिरवलं. त्या चित्रा वाघ यांच्याबद्दल मेहबूब शेख याने अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे मेहबूब शेखची तंडगी तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. पोलिसांनी मेहबूब शेखवर कारवाई केली नाही, तर राज्यात फिरून देखील देणार नाही," असं प्रसाद लाड यांनी ठणकावून सांगितलं.

मेहबूब शेख यांनी काय म्हटलं?

यावर मेहबूब शेख म्हणाले, "चित्रा वाघ यांना जी भाषा कळते, त्याच मी भाषेत मी बोललो आहे. मुळात चित्रा वाघ यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास एका मुलीला सांगितलं. तेव्हा, माझ्यावर आणि कुटुंबावर काय प्रसंग ओढवला, हे भाजपवाल्यांना माहिती नाही. मी कोणत्याही महिला नेत्याला खालच्या पातळीवर बोलत नाही. लाचखोर नवऱ्याच्या बायकोला जी भाषा कळते, त्याच भाषेत मी बोलतो."

Mahebub Shaikh | chitra wagh | prasad lad
Chitra Wagh : चित्रा वाघांच्या सोयीच्या नैतिकतेचा बुरखा न्यायालयाने टराटरा फाडला

वाघ यांची भाषा सभ्यपणाची आहे का?

"मला महाराष्ट्रात फिरण्यास कोण थांबणार आहे, हे पण मी बघतो. शरद पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला चित्रा वाघ खालच्या पातळीवर टीका करतात, तेव्हा भाजप कुठे असते? भाजप चित्रा वाघ यांना ही भाषा बोलायला लावते का? वाघ यांची भाषा सभ्यपणाची आहे का? आधी सभ्यपणा शिकवावा नंतर बाकींना बोलावं," अशा शब्दांत शेख यांनी लाड यांना फटकारलं आहे.

लाचखोर नवऱ्याच्या बायकोची माफी मागू का?

"असे खूप प्रसाद लाड पाहिले आहेत... चल हवा येऊ दे... लाड यांनी घरात बसून व्हिडिओ बनवू नये. महाराष्ट्रात काय, मुंबईत कुठे येऊ सांगा? तुमच्या निवासस्थानासमोर येतो. चित्रा वाघ यांना जी भाषा कळते, तिच बोलणार... बाकी महिला नेत्यांना बोललो, तर 10 वेळा माफी मागू.. अशा लाचखोर नवऱ्याच्या बायकोची माफी मागू का?" असा खोचक सवाल मेहबूब शेख यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com