Mahesh sawant Won : मोठी बातमी! अमित ठाकरेंचा पराभव, महेश सावंत विजयी

Amit Thackeray loses assembly elections, Mahesh Sawant wins: माहिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. मात्र, येथे तिरंगी लढत झाली. शिवसेनेच्या फूटीनंतर येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.
amit Thackeray
amit Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mahim Assembly Constituency : माहिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. मात्र, येथे तिरंगी लढत झाली. मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांनी येथून विजय मिळवला.

शिवसेनेच्या फूटीनंतर येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे माहिमची लढतही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी महत्त्वाची होती. त्यांनी सदा सरवणकर यांचे एकेकाळचे शिष्य महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात याच मतदारसंघातून उतरले होते.

अमित ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. माहिम मतदारसंघातमध्ये मनसेचा मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. 2009 मध्ये नितीन सरदेसाई हे याच मतदारसंघातून मनसेकडून विजयी झाले होते. तर, 2019 च्या निवडणुकीत मनसेकडून संदीप देशपांडे हे लढत होते. ते सदा सरवणकर यांच्याकडून पराभूत झाले मात्र तरीसुद्धा संदीप देशपांडे यांना तब्बल 42 हजार मतं मिळाली होती.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

amit Thackeray
Sangram Jagtap Won : झुंजवलं तरी जगतापांची सहज हॅटट्रिक; आता 'वेध' मंत्रीपदाचे!

माहिम मतदारसंघात मराठी मतदार सर्वाधिक आहे. त्यामुळेच माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये मराठी मतदार कोणाच्या मागे उभा राहणार याची उत्सुकता होती. शिवाय येथील मुस्लिम मतदार देखील महत्त्वाची भूमिका पार पाडतील, अशी शक्यता निवडणुकीच्या आधीच वर्तवली जात होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

लोकसभेला महायुतीला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यामुळे अमित ठाकरे यांना महायुतीमधून पाठींबा मिळेल असे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे उमेदवारी ठाम राहिले. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत झाली.

amit Thackeray
Ajit Pawar News : निकालानंतर अजितदादांकडून 'तो' फोटो शेअर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com