Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश आणि मुंबईतील विशेष एनआयए न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.दिवाळीच्या सुट्टीत सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात धमकीचा फोन आला होता.या प्रकरणी कुलाबा पोलिस आणि एनआयए तपास करत आहे. मात्र ही धमकी कोणी दिली हे अद्याप समजू शकले नाही.
16 वर्षापूर्वी 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अजुनही सुरू होती.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये एका मशिदीजवळ मोटारसायकलवर लावलेल्या बॉम्बेचा स्फोट झाला. यामध्ये 6 जण ठार झाले तर 100 हून अधिक जखमी झाले. याच प्रकरणात भाजप नेत्या, माजी खासदार प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर पाच जणांवर स्फोटाच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे.
या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्राच्या एटीएस म्हणजेच दहशतवादविरोधी पथकाने सुरू केला होता. नंतर 2011 मध्ये हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.
मालेगाव मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माजी एटीएस तपास अधिकाऱ्यानी तपासात अनियमितता केल्याचा आरोप केला होता. तसेच साक्षीदाराला धमकवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याच प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णीने यांनी गेल्यावर्षी मुंबईतील विशेष कोर्टासमोर लेखी अर्जाद्वारे केली होती.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी या मालेगाव स्फोटामागे सरकारने बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. तर, प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलाने न्यायालयात दावा केला की, स्फोटानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना घटनास्थळावर जाण्यापासून रोखले. त्यामुळे सिमीच्या सदस्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून केला गेला असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.