
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते त्यासाठी नाशिक महापालिकेकडून तब्बल १५ हजार कोटींचा आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. परंतु शासनाकडून अद्याप एक रुपयाचाही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे नाशिक सिंहस्थांचा कुंभ निधीअभावी अद्याप रिताच आहे.
राज्य सरकारकडून निधी मंजूर न झाल्याने नाशिक महापालिकेवर आता कर्ज काढून कुंभमेळा साजरा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत स्वनिधीतून वेळेत पूर्ण होऊ शकतात अशी कामे प्राधान्याने सुरु करण्याच्या राज्यसरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे निधी उभारणीसाठी महापालिकेची खटपट सुरु झाली आहे. त्यासाठी महापालिकेने ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून स्वारस्य देकार मागविले जाणार आहे. साधरण आठ ते दहा वर्षात हे कर्ज फेडण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.
याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पावणे तीनशे कोटींचे हरित कर्जरोखे काढले जाणार आहे. कुंभेमळ्याची कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका एकुण ५७५ कोटींचा निधी बाह्य यंत्रणेमार्फत उभारणार आहे. या कर्जासाठी महापालिका आपल्या मिळकती तारण देणार आहे. त्यातही आता यासाठी नियुक्त केलेल्या कमिटीने हरित कर्ज रोख्यांऐवजी नियमीत कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात बदल करताना आता पावणे तीनशे ( २७६ कोटींचे ) म्युनिसिपल बॉण्ड काढले जाणार आहे.
दरम्यान शासनाने सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एक हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करत निधीला मान्यता दिली. परंतु त्यात महापालिकेचा हिस्सा अद्याप स्पष्ट झालेला नाही. महापालिका, प्राधिकरण व जिल्हा प्रशासन या तीन यंत्रणांपैकी हा निधी कुठल्या यंत्रणेमार्फत खर्च करायचा हेच स्पष्ट नसल्याने मोठा गोंधळ आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने जगभरातून नाशिकमध्ये लाखो भाविक नाशिक कुंभनगरीत दाखल होतील. या भाविकांना विविध प्रकारच्या सेवा-सुविधा महापालिकेला पुरवाव्या लागणार आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता स्वनिधीतून कुंभमेळ्याची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कर्जरोखे व कर्ज काढून निधी उभारण्याची तयारी महापालिकने सुरु केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.