Mallikarjun Kharge Controversy : मल्लिकार्जून खर्गेंनी पंतप्रधान मोदींचा बाप काढला, भाजप प्रचंड आक्रमक; CM फडणवीसांनी काँग्रेसला सुनावले, 'तुम्ही पुन्हा...'

Mallikarjun Kharge narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दिवंगत वडिलांबद्दल वापरलेली असभ्य भाषा काँग्रेस पक्षाच्या निर्लज्जपणा दर्शवते.
Mallikarjun kharge  narendra Modi
Mallikarjun kharge narendra Modisarkarnama
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis News : बिहारमधील एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. खर्गे हे व्यासपीठावरून बोलत असताना एक जण म्हणाला की मोदी जाणार नाही. त्यावर खर्गेंनी मोदीच्या बापाला देखील जावे लागेल, असे वक्तव्य केले.

खर्गे यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. खर्गेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून देशभर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खर्गेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करत काँग्रेसवर देखील हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की , हे चांगले झाली खर्गेजी तुम्ही सार्वजनिक मंचावरून अशी भाषा वापरली, जी सहसा केवळ काँग्रेस पक्षाच्या बंद दारांआडच ऐकायला मिळते. आता देशाला कळून चुकले आहे की काँग्रेस पक्ष नक्की काय आहे.

काँग्रेसचा पराभव होईल

पुढे ते म्हणाले की, मोदीजींच्या दिवंगत वडिलांबद्दल वापरलेली असभ्य भाषा काँग्रेस पक्षाच्या निर्लज्जपणा दर्शवते. मी पुन्हा सांगतो, पुढची निवडणूकही तुम्हीच हरणार आहात. याचे एक कारण नक्कीच मोदीजींबद्दल लोकांच्या मनात असलेली आपुलकी हे असेल, परंतु तुमच्या स्वतःच्या द्वेषपूर्ण शब्दांमुळेही तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल.

Mallikarjun kharge  narendra Modi
Narendra Modi News : '...तेव्हा मोदी केंद्र सरकारविरोधातच युद्ध पुकारणार होते!'; भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या दाव्यानं खळबळ

खर्गेंनी माफी मागावी

केंद्रीय मंत्री नितीन गडकीर यांनी देखील काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या स्वर्गवासी वडिलांविषयी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पटना येथे केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे.

हे पहिल्यांदा नाही की प्रधानमंत्र्यांच्या कुटुंबाबद्दल अशा प्रकारची भाषा ऐकायला मिळाली. त्यांच्या सामान्य पार्श्वभूमीची खिल्ली उडवली गेली. त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापले गेले, आता तीच भाषा काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या तोंडातून बाहेर पडते. खर्गे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी. जनता लक्ष ठेवून आहे आणि लोकशाही मार्गाने नक्कीच आपली प्रतिक्रिया देईल.

Mallikarjun kharge  narendra Modi
Milan Pradhan Arrested : काँग्रेस उमेदवाराला अटक; 'भाजप घाबरली...', मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी तुटून पडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com